AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेस आक्रमक, राष्ट्रवादीला घ्यावा लागला असा निर्णय

pune lok sabha by election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. भाजपमध्ये यासंदर्भात अंतर्गत चर्चा सुरु असताना महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला निर्णय बदलला...

पुणे लोकसभेसाठी काँग्रेस आक्रमक, राष्ट्रवादीला घ्यावा लागला असा निर्णय
Image Credit source: tv9
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 06, 2023 | 9:10 AM
Share

योगेस बोरसे, पुणे : भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून त्याची तयारी सुरु झाली आहे. परंतु पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पावले मागे घेतलीय.

काय केले राष्ट्रवादीने

काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणे टाळले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन पावले मागे आले आहे. परंतु दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांसह हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांच्यावर दिली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय कमिट्यांचा आढावा घेऊन त्याची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आले आहे. या बूथनिहाय कमिट्याची जबाबदारी तुपे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी काय म्हणाले होते अजित पवार

पुणे लोकसभेच्या जागेवर अजित पवार यांनी दावा केला होता. आठवड्याभरापूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, त्यानुसार या जागेचा निर्णय होईल. परंतु शनिवारी मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

काँग्रेसचे काय ठरले

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मुंबईत शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचे यासंदर्भात एकमत झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. शहराध्यक्षांना पक्ष संघटनात्मक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचं लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठीही तयारी करण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

भाजपची तयारी सुरु

लोकसभा पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?