AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गोलमाल? महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय

Pune unauthorized hoardings : पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला होता.

पुणे होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गोलमाल? महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
pune mahanagarpalikaImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 13, 2023 | 1:22 PM
Share

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : अनधिकृत होर्डिंग्ज अनेक शहरात उभारले जातात. शहरांचा चेहरा खराब करण्याचे काम हे होर्डिंग करतात. परंतु धोकादायक पद्धतीने उभारलेल्या होर्डिंगने पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी पाच जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडीमधील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासन खळवळून जागे झाले. त्यांनी अनधिकृत होर्डिंग्जवर करत स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. आता या ऑडिटमधील गोलमाल समोर आला आहे. यामुळे मनपाने मोठा निर्णय घेतला आहे.

काय झाला प्रकार

पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बहुसंख्य होर्डिंग कंपन्यांनी एकाच संस्थेने तयार केलेला ऑडिट अहवाल दिला. पुणे महानगरपालिकेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने पावले उचलली गेली. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पाच सदस्यांचे पॅनेल तयार करण्याचा निर्णय पुणे  मनपाने घेतला आहे.

का घेतला हा निर्णय

मनपाकडे दाखल झालेल्या होर्डिंगच्या ऑडिटवरील विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. ऑडिट अहवाल तयार करताना चुकीची पायंडा वापरला गेला असेल. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाकडे दाखल केलेल्या 50% पेक्षा जास्त स्ट्रक्चरल ऑडिट फक्त एकाच संस्थेद्वारे केले जातात. याशिवाय, स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपन्यांची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. यामुळे पाच जणांची समिती तयार करण्यात आली असून ते या ऑडिटचे ऑडिट करणार आहेत.

किती बेकायदेशीर होर्डिंग काढले

आता महानगरपालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी पाच सदस्यीय पॅनेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपर चिंचवड शहरात एकूण 2,300 कायदेशीर होर्डिंग्ज आहेत. शहरात 1,000 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज होते ते काढले गेले आहेत. परंतु यानंतर अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिग्ज आहेत, त्यावर अजून कारवाई झालेली नाही. परंतु आता मनपाने पाच जणांची समिती तयार केली असल्यामुळे हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केले जातात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?