Ajit Pawar | पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळणारं घर विकण्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar | अजित पवार यांनी पुणेकरांच्या सहनशीलतेला का सलाम केला? 'हे ट्रिपल इंजिनच सरकार आहे' असं अजित पवार यांनी सांगितलं.

Ajit Pawar | पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळणारं घर विकण्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 01, 2023 | 3:07 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो 2 मार्गांच ऑनलाईन उद्घाटन झालंय. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राला पुण्याच्या विकास कार्याला साथ दिली आहे. मोदी सतत सहकार्य, प्रोत्साहन देत असतात आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मोदीजी स्वत: उपस्थित राहिले, त्यासाठी मी मनापासून आभार मानतो” असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

“पहिल्या टप्प्याच भूमीपूजन आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. आता दुसऱ्या टप्प्याच उद्घाटनही मोदींच्या हस्ते होतय” असं अजित पवार म्हणाले.

‘पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम’

“मी पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम करतो. ही काम करताना पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी कोरोना आला, कधी अन्य अडचणी. पण तुम्ही सहनशीलता दाखवली. कामाला विलंब होऊ नये, असा प्रयत्न असतो” असं अजित पवार म्हणाले.

‘हे ट्रिपल इंजिनच सरकार’

“आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास गतीने व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे ट्रिपल इंजिनच सरकार आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी मदत करतायत. पुणेकर, पिंपरी-चिंचवड करांचा प्रवास सुलभ व्हावा, ही भावना असते” असं अजित पवार म्हणाले.

‘राजकारण न करता पुणेकरांनी साथ दिली’

“मेट्रोच काम सुरु असताना कामगार मैदानाजवळ अनेक प्रश्न निर्माण झाले होते. 5 हजार नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न होता. परंतु पुणेकरांनी राजकारण न करता सर्व लोकप्रतिनिधींनी साथ दिली. अधिकारी वर्गाने लक्ष घातलं” असं अजित पवार म्हणाले.

मोदींच्या हस्ते मिळणाऱ्या घराबद्दल अजित पवार काय म्हणाले?

“ज्या नागरिकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते घर मिळणार आहे, त्यांनी ते घर विकण्याचा विचारही मनात आणू नये हा माझा त्यांना सल्ला आहे” असं अजित पवार म्हणाले. सर्वांना सुख, समृद्धी लाभो, तुम्ही आनंदाने जीवन जगा असं अजित पवार म्हणाले.