AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे मेट्रो जोरदार, एकाच दिवसात विक्रमी प्रवाशांनी केला प्रवास

pune metro news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. आता मेट्रोच्या उद्घघाटनास जवळपास एक महिना झाला आहे. महिन्याभरात पुणेकरांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

Pune News : पुणे मेट्रो जोरदार, एकाच दिवसात विक्रमी प्रवाशांनी केला प्रवास
Pune Metro
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 28, 2023 | 10:55 AM
Share

पुणे | 28 ऑगस्ट 2023 : पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. यानंतर पुणेकर मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रस्तावरील खासगी वाहने कमी होत असून प्रदूषणाची पातळी सुधारणार आहे. शनिवार आणि रविवारी मेट्रोमधून प्रवासासाठी सुट असल्यामुळे या दोन दिवशी प्रवाशांची चांगली गर्दी होत आहे. आता रविवारी पुणेकरांनी मेट्रो प्रवाशाचा विक्रम केला आहे.

किती जणांनी घेतला प्रवासाचा आनंद

रविवारचा मुहूर्त साधत पुणेकरांनी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल 80 हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. एकूण 80 हजार 868 जणांनी रविवारी दिवसभरातून पुणे मेट्रोचा वापर केला आहे. यामुळे पुणे मेट्रोचे एक दिवसाचे उत्पन्न कोटीच्या घरात गेले आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानक, वनाज मेट्रो स्थानक, रुबी हॉल मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रविवार सुटीचा आनंद घेण्यासाठी मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी होती.

रविवार अन् शनिवारी मिळते सुट

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या शनिवार आणि रविवारी ३० टक्के सुट देण्यात येते. त्यामुळे मेट्रो प्रवास करणाऱ्यांची संख्या या दोन दिवसांत वाढत असते. तसेच मेट्रोने विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३० रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेले आहे. दर दहा मिनिटांना मेट्रो असणार आहे. कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा असेल.

मेट्रोचा होणार विस्तार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रकल्पासंदर्भात पुण्यात नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना निगडी ते कात्रज अशी थेट मेट्रो मिळणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाची मदत घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?