AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Student | एमपीएससीच्या पीएसआय भरतीमध्ये आयोगाचा पुन्हा घोळात घोळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदललेल्या नियमामुळे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आता २०२० ला असणारा नियम आयोगाने बदलला आहे.

MPSC Student | एमपीएससीच्या पीएसआय भरतीमध्ये आयोगाचा पुन्हा घोळात घोळ
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Mar 17, 2023 | 11:13 AM
Share

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. एमपीएससी मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार बसत आहे. यामुळे शरद पवार यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागले. आता एमपीएससीच्या पीएसआय भरतीमध्ये आयोगाचा पुन्हा घोळ उघड झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  (Maharashtra Public Service Commission) पीएसआय पदाचा महिला भरतीसाठीचा क्रायटेरिया बदलला आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थींनींना बसणार आहे. महिला भरती करण्यासाठी मैदानी परीक्षेसाठी आयोगाने नवे नियम तयार केले आहे. मैदानी परीक्षेसाठी असणारा क्रायटेरिया आयोगाकडून बदलला गेला आहे. 2020 ला वेगळे नियम तर 2021 भरतीसाठी आयोगाने नवीन नियम तयार केले आहे. “लांब उडी” संदर्भात बदललेल्या नियमावरुन विद्यार्थीनी आक्रमक झाल्या आहेत. मैदानी परीक्षेचा क्रायटेरिया आयोगाने बदलू नये, अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थिनींनी आयोगाकडे केली आहे.

काय झाला बदल

वॉकिंग, रानिंग आणि गोळा फेक या तीन मैदानी परीक्षा याआधी आयोगाकडून घेतल्या जात होत्या. आता या नियमांमध्ये बदल करून रनिंग, लांब उडी आणि गोळा फेक करण्यात आले आहे. लांब उडीसंदर्भातील बदलास महिला परीक्षार्थींनी विरोध केला आहे. हा बदल त्यांना अवघड जाणार आहे. आयोगाने नियम बदलू नये, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

यापूर्वी झाले आंदोलन

एमपीएससी विद्यार्थ्यांनी यापूर्वी आंदोलन केले होते. त्यांनी एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर ही मागणी मान्य झाली.

एमपीएससीचा अभ्यासक्रम २०२३ पासून अचानक बदलण्यात आला. युपीएससी परीक्षेसारखा हा अभ्यासक्रम केला गेला. विद्यार्थी अनेक वर्षांपासून जुन्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करत आहेत. परंतु अभ्यासक्रम बदल्यामुळे त्यांची गेल्या काही वर्षांपासूनची मेहनत वाया जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.