AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune mumbai expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर या वाहनांना प्रवेश बंदी, किती तास राहणार बंद

pune mumbai expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. परंतु आता हा महामार्ग काही वाहनांसाठी बंद असणार आहे. २४ पेक्षा जास्त तास या महामार्गावर त्या वाहनांना प्रवेश नसणार आहे.

pune mumbai expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर या वाहनांना प्रवेश बंदी, किती तास राहणार बंद
| Updated on: Sep 26, 2023 | 10:28 AM
Share

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या महामार्गावर शनिवारी आणि रविवारी नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तसेच सार्वजिनक सुट्या असल्या की महामार्गावर वाहने वाढतात. यामुळे वाहनधारकांना नेहमी वाहतूक कोंडीत अडकावे लागते. हा महामार्ग देशातील टॉप 10 व्यस्त मार्ग आहे. आता वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट वाहनांसाठी हा मार्ग २४ पेक्षा जास्त तास बंद असणार आहे.

का असणार महामार्ग बंद

गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई एक्स्प्रेसवर मोठे बदल करण्यात आले आहे. या महामार्गावर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर २८ तारखेला अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यभरात गणेश विसर्जनासाठी मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर सुद्ध वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे जड वाहनांना हा महामार्ग बंद असणार आहे.

किती वेळ असणार बंद

२७ तारखेला मध्यरात्री १२ पासून द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही प्रवेश बंदी २९ तारखेला रात्री १२ वाजेपर्यंत राहणार असणार आहे. गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या काळात अवजड वाहनांना जुन्या मार्गाचा पर्याय असणार आहे. यामुळे जुन्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात असणार बंदी

गणपती विसर्जन आणि ईदच्या दिवशी लाखो नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते. पुणे शहरात १६ तारखेपासून २८ तारखेपर्यंत मोठ्या आणि अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ही बंद २४ तास बंदी असणार आहे. या काळात जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.