AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी

Pune Municipal Corporation: केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभागाकडून यापूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी
| Updated on: Feb 13, 2025 | 7:21 PM
Share

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेने पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. गणपती किंवा इतर कोणत्याही सणांच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने यासंदर्भात आदेश काढले आहे.

पुणे मनपाचा काय आहे आदेश

केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभागाकडून यापूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करण्याऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक जैविक घटक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती तयार कराव्या, असे पुणे महानगरपालिकेने म्हटले आहे. तसेच सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठाण्यात यापूर्वी बंदी

पुणे मनपापूर्वी ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरात प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींच्या विक्रीवर बंदी घातली होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण (संरक्षण) कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला होता. माघी गणपतीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असणाऱ्या मंडळांना मुंबई मनपाने नोटीस दिल्या होत्या. त्यासंदर्भातील मुद्दा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

उच्च न्यायालयाने, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मूर्ती बनवण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. मूर्तीकारांनी मूर्ती रंगवण्यासाठी हळद, चंदन आणि गेरूचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. फुले, कपडे आणि इतर पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे, असेही म्हटले आहे.

दरम्यान मूर्तीकर संघटनांनी पीओपी मूर्ती बंदीच्या निर्णयास विरोध केला आहे. यामुळे लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, असे मूर्तीकर संघटनेचे पदाधिकारी हितेश जाधव यांनी सांगितले.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.