AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुणे महापालिकेने सोमय्या यांच्या सत्काराला परवानगी नाकारली; मात्र सत्कार करणारच भाजपची आक्रमक भूमिका

उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं, त्या कंपनीवर पुणे पोलिसांनी पीएमआरडीए का कारवाई केली नाही. संजय राऊतांच्या मित्र या कंपनीत पाटनर आहे म्हणून कारवाई केली नाही. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड सेंटरमध्ये भष्ट्राचार करून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचे पाप केलं. संजय राऊतांना एवढी मस्ती आहे लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा. उद्धव ठाकरेंनी हे सर्व घडवलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे

Pune | पुणे महापालिकेने सोमय्या यांच्या सत्काराला परवानगी नाकारली; मात्र सत्कार करणारच भाजपची आक्रमक भूमिका
kirit-somayya
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 11, 2022 | 3:22 PM
Share

पुणे – महापालिका आवारात सोमय्या यांच्या सत्काराला पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation)परवानगी नाकारली आहे. परवानगी नसली तरी भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya)यांचा सत्कार करणारच असल्याची आक्रमक भूमिका पुणे शहर भाजपने(BJP)घेतली आहे. गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली होती. यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली आहे. मात्र आज दुपारी किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला जाणार होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच आज जो पोलीस बंदोबस्त होता,त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी 100 गुंड पाठवले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुणे पोलिसांनी पीएमआरडीए का कारवाई केली नाही

उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं, त्या कंपनीवर पुणे पोलिसांनी पीएमआरडीए का कारवाई केली नाही. संजय राऊतांच्या मित्र या कंपनीत पाटनर आहे म्हणून कारवाई केली नाही. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड सेंटरमध्ये भष्ट्राचार करून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचे पाप केलं. संजय राऊतांना एवढी मस्ती आहे लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा. उद्धव ठाकरेंनी हे सर्व घडवलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या 100 गुंड महापालिकेला सुट्टी असताना पाठवलेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे वाधवा प्रकरणात सुटलेत, मात्र आता सुटणार नाहीत, कारवाई होणार आहे.

महाराष्ट्र बनले इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे हब! ठाणे, नाशिक,औरंगाबाद, नागपूरमध्ये 16,775 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रः व्याजसह कर सवलतीचा ही फायदा गुंतवणूक तुमच्या फायद्याची..!

Lock Up Show : कंगना रनौतच्या ‘लॉकअप’चा टीझर आऊट, ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट