पुणेकरांना दिलासा, शहरातील मोठ्या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

पुणे शहरासाठी महत्वाचा असणारा मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प मनपाकडून राबविला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. परंतु या प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केला असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी करत होते.

पुणेकरांना दिलासा, शहरातील मोठ्या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
पुणे महानगरपालिकाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 4:31 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Mod) पुण्यात (Pune) उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेचा मार्ग मोकळा झालाय. 7 हजार कोटींचा हा नदीसुधार योजनेचा प्रकल्प पर्यावरण वाद्यांचे आक्षेपामुळे थांबला होता. या प्रकल्पाविरोधात असणारी याचिका फेटाळण्यात आलीय. यामुळे हा प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात असणारे सर्व अडथळे दूर झाले आहे. भाजप नेते व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्टिट करून ही माहिती दिली आहे. या प्रकल्पात 6 हजार झाडं तोडली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून विरोध करण्यात येत होता.

एनजीटीने फेटाळली याचिका

पुणे महापालिकेकडून मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.परंतु या प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केला असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी संस्थांकडून करण्यात येत होता. या प्रकल्पात 6 हजार झाडं तोडली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत होता त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर २०२२मध्ये एनजीटीने त्यांची याचिका फेटाळली होती.

सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

एनजीटीनंही ही याचिका फेटाळून लावली होती आता सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली आहे. याचिका रद्द करताना आराखड्यामध्ये काही बदल करायचे झाल्यास या बदलांना पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी, असे बंधन घातले होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केल्याचे ट्विट माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. पर्यावरणाच्या अनुषंघाने सर्वांगीण विचार करुनच आपण हा प्रकल्प अंतिम केला होता, त्यावर आता न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने निश्चितच समाधान आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार करण्याचाच निश्चित प्रयत्न असेल, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेय.

2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे.पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या 44 कि. मी. लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.

प्रकल्पाचा काय होता उद्देश

  • नद्यांमुळे येणारे पूर कमी करणे
  • नद्या स्वच्छ करणे
  • नद्यांचे पुनरुज्जीवन करणे
  • नद्यांचे आणि नागरिकांचे नाते जोडणे
Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.