AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुण्यात गोळीबाराचा थरार! 3-4 जण सलूनमध्ये शिरले अन्… वारजे परिसर हादरला

Pune Crime : आज सायकांळी 8 च्या सुमारात पुण्यात गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी! पुण्यात गोळीबाराचा थरार! 3-4 जण सलूनमध्ये शिरले अन्... वारजे परिसर हादरला
Warje FiringImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 24, 2026 | 10:13 PM
Share

गेल्या काही काळापासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना काही प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. आज सायकांळी 8 च्या सुमारात पुण्यात गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. 3-4 जणांनी सलूनमध्ये घुसून हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत 2 जण जखमी झाले असल्याचेही समोर आले आहे. या गोळीबाराच्या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुकानात घुसून गोळीबार

पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. आज सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. 3-4 जणांनी दुकानात घुसून केलेल्या गोळीबारात 2 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरूणाची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

तपासाला सुरूवात

पुण्याच्या वारजे भागात सायंकाळच्या वेळेला लोकांची मोठी गर्दी असते, याच गर्दीच्या वेळी हा गोळीबार झाला आहे. गोळीबार करताना वापरलेली बंदूक तरूणाच्या हातात फुटल्याचेही समोर आलेले आहे. त्यामुळे या घटनेत गोळीबार करणाऱ्याच्याही हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या गोळीबारामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याआधीही घडल्या होत्या घटना

पुण्यातून याआधीही गोळीबाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. मात्र आज वर्दळीच्या भागात रहदारी असताना हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण याआधीच्या घटनांमध्ये गँगवॉरमधून गोळीबार आणि खून झाल्याचे समोर आले होते. आज घडलेल्या घटनेत गँगवॉर तर नाही ना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आता पुणे पोलीस या घटनेतील आरोपींवर नेमकी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. तसेच आगामी काळा अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?