Pune Loudspeaker : महाआरती करण्यास मनाई नाही, मात्र…; काय म्हणाले पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता?

| Updated on: May 04, 2022 | 12:13 PM

मंदिरातील आरती कोणीही थांबवणार नाही. पण जाणीवपूर्वक कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई होईल. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही. नागरिकांनी शहर शांत ठेवावे, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.

Pune Loudspeaker : महाआरती करण्यास मनाई नाही, मात्र...; काय म्हणाले पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता?
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : सकाळपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर आहेत. शहरात सर्वत्र शांतता आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानुसार नियमांचे पालन होईल. जे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) म्हणाले आहेत. मनसेतर्फे आज खालकर चौकातील मारुती मंदिरात महाआरती तसेच मारुती स्तोत्रपठण करण्यात आले. त्यानंतर पुरातन पुण्येश्वर मंदिरात महाआरती करण्यात येण्याचे मनसेतर्फे (Pune MNS) सांगण्यात आले होते. मात्र कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूणच मनसेच्या मुद्द्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता बोलत होते. महाआरती करण्यास कोणाचीही मनाई नाही. मात्र सर्व गोष्टी कायद्यानुसार व्हायला हव्या, कायदा मोडल्यास कारवाई करणार, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले आहेत.

पुण्यात शांतता

सध्या मनसे लाऊडस्पीकरवरून आक्रमक आहे. त्यांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार सध्या सर्वत्र मनसे रस्त्यावर उतरलेली दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी हनुमान चालिसा लावण्यात आली नाही. कारण मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाजही आज ऐकायला नाही मिळाला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अनेक मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा राखत अजान झाली. पुण्यातही शांतता पाहायला मिळाली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनुचित प्रकार होणार नाही. केल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

‘कायदा मोडल्यास कारवाई’

मंदिरातील आरती कोणीही थांबवणार नाही. पण जाणीवपूर्वक कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई होईल. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही. नागरिकांनी शहर शांत ठेवावे. चिथावणी देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. शहरात साधारण दोन ते अडीच हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी अजान लाऊडस्पीकरशिवाय तसेच कमी आवाजात झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाआरती करणार असल्याचा निर्धार मनसे नेते अजय शिंदे यांनी खालकर चौकातील महाआरतीच्या कार्यक्रमानंतर दिला.