पुणे शहरात मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांच्या मोठ्या कारवाईत संचालक जाळ्यात

पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू भाग समजला जातो. या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु होता. त्याचा भांडाफोड पोलिसांनी केला. या प्रकरणी संचालकास अटक केली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी सात मुलींची सुटका केली आहे. या मुली दुसऱ्या राज्यातून आणल्या गेल्या होत्या.

पुणे शहरात मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांच्या मोठ्या कारवाईत संचालक जाळ्यात
पुणे मसाज सेंटर
Image Credit source: social media
| Updated on: Mar 21, 2023 | 4:45 PM

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात Sex Racket सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) भांडाफोड पोलिसांनी केला होता. या प्रकरणी संचालकास अटक केली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी सात मुलींची सुटका केली आहे. या मुली दुसऱ्या राज्यातून आणल्या गेल्या होत्या.

पोलिसांनी मसाज सेंटर चालवणाऱ्या दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात व्यवस्थापक असलेला उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३२) व संचालक गजानन दत्तात्रेय आडे याचा समवेश आहे. छापा टाकला त्यावेळी पोलिसांनी उत्तम सोमकांबळे याला अटक केली.

पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरमध्ये देह व्यापार सुरु असल्याची माहिती मिळाली. कोरेगाव पार्कमधील साऊथ मेन रोडवर हे मसाज सेंटर होते. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून भांडाफोड केला. या ठिकाणावरुन पोलिसांनी सात मुलींना ताब्यात घेतले आहे.

काय असतो स्पा सेंटर

पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटरचा फंडा गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. भारतातील अनेक लहान, मोठ्या शहरांमध्ये स्पा सेंटरचे बोर्ड लावलेले दिसतात. या ठिकाणी मसाज केली जाते. स्वीडिश, डिप टिश्यू व ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे अनेक पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून काही ठिकाणी वेश्याव्यवसाय केला जातो.

शहरात अनेक ठिकाणी सेंटर

शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी अशा सेंटर्सवर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही स्पा तर निवासी संकुलातही थाटण्यात आल्याचे प्रकार याआधी समोर आले होते. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.