AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गजा मारणेच्या ताफ्यातील 300 गाड्यांनी टोल बुडवला; खंडणीचा गुन्हा दाखल होणार

तळोजा ते पिंपरी-चिंचवडपर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. या सगळ्या गाड्यांनी उर्से टोलनाक्यावर टोल भरला नव्हता. | gaja marne procession

गजा मारणेच्या ताफ्यातील 300 गाड्यांनी टोल बुडवला; खंडणीचा गुन्हा दाखल होणार
एका खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. तळोजा ते पिंपरी-चिंचवडपर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 24, 2021 | 8:22 AM
Share

पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याला जंगी मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्याचा नाद चांगलाच महागात पडला आहे. कारण, पोलिसांनी आता गजा मारणे याच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे सध्या फरार असलेल्या गजा मारणेच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे. (Pune police will file extortion case against gangster Gaja Marne)

एका खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. तळोजा ते पिंपरी-चिंचवडपर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. या सगळ्या गाड्यांनी उर्से टोलनाक्यावर टोल भरला नव्हता. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत सर्व वाहने पुढे नेली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे आता पोलिसांकडून गजा मारणे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

नेमकं काय घडलं होतं?

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

ती लँडक्रुझर कार होणार जप्त?

गजा मारणे ज्या गाडीत बसून तळोजा कारागृहातून बाहेर पडला ती लँडक्रुझर कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची होती. या गाडीची सध्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांकडेच ही कार आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीनंतर आता ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे लँडक्रुझर कार गुंडाला देणे नारायण गलांडे यांना भलतेच महागात पडले, अशी चर्चा सुरु आहे.

गजा मारणे फरार

या सगळ्या प्रकरणानंतर गजा मारणे फरार झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आली होती. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत.

संबंधित पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी अचानक छापेमारी सुरु केली आहे. आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मारणेच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

गजानन मारणेपाठोपाठ आता शरद मोहोळविरोधातही गुन्हा दाखल

VIDEO| गजा मारणेची तळोजा कारागृहातून मुक्तता; मारणे टोळीचा मिरवणूक काढून जल्लोष

VIDEO | गुंड गजानन मारणेच्या साथीदारांचा एक्स्प्रेस वेवर हलकल्लोळ, पोलिसांनी ड्रोन जप्त करताच पळापळ

(Pune police will file extortion case against gangster Gaja Marne)

Follow Us
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल