मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली होती अश्विनी, मद्यधुंद राजकुमाराने घेतला जीव

पुण्यातील पोर्शे कारने दिलेल्या धडकेत अश्विनी आणि तिचा मित्र अनिस यांचा मृत्यू झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका बिल्डरच्या मुलाने या दोघांना उडवलं. काही तासातच त्याची अल्पवयीन असल्याने जामिनावर सुटका झाली. पण या दोघांचा जीव गेला त्याचं काय. याला जबाबदार कोण?

मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली होती अश्विनी, मद्यधुंद राजकुमाराने घेतला जीव
| Updated on: May 21, 2024 | 9:14 PM

अश्विनी आणि अनिश यांचे मृतदेह पुण्याच्या रस्त्यावर पडले होते. दोघेही वाढदिवसाच्या पार्टीतून परतत होते. 2 कोटी रुपयांच्या पोर्श कारवर स्वार झालेल्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बिल्डर वडिलांच्या राजकुमाराने त्यांना चिरडले. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर पोलिसांकडून कडक कारवाईचे संकेत मिळत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आश्वासन दिले.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले अश्विनी आणि अनिशची गोष्ट मध्यमवर्गीय मुलांसारखी होती. अभ्यास करून त्यांना मोठे व्यक्ती व्हायचे होते. पालकांना पुढे जाऊन आधार द्यायचा होता. त्यासाठी दोघेही जबलपूर येथून पुण्याला आले होते. अभ्यासात नेहमीच हुशार असणारी अश्विनी आयटी इंजिनीअर झाली आणि नोकरी करण्यासाठी पुण्याला आली.

आई-वडिलांकडे आता फक्त आठवणी

पुणे हिट अँड रन प्रकरणात जीव गमावलेल्या मध्य प्रदेशातील अश्विनी कोष्टा पंचतत्वात विलीन झाली. कुटुंबाकडे आता फक्त कडू गोड आठवणी राहिल्या. अश्विनीच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. मुलीच्या डोळ्यात त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. मुलीच्या यशामुळे पालकांची छाती अभिमानाने फुगली होती. पण याला कोणाची नजर लागेल असं कधीच त्यांना वाटलं नव्हतं.

अश्विनीचे वडील सुरेश कोस्टा आपली मुलगी आता या जगात नाही हे स्वीकारु शकत नाहीयेत. 24 वर्षांची अश्विनी एका श्रीमंत माणसाच्या चुकीमुळे बळी पडली. पुण्यात दारूच्या नशेत असलेल्या बिल्डरच्या मुलाने दुचाकीवरून जात असलेल्या अश्विनीला चिरडलं. अश्विनीचे वडील मध्य प्रदेश वीज मंडळात काम करतात. आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने मुलांना शिकवलं. दोघे इंजिनीअर झाले. मोठा भाऊ बंगळुरुला कामाला आहे. आई-वडील जबलपूरमध्ये एकटेच राहत होते. अश्विनीचा शेवटचा फोन अजूनही वडिलांना आठवतोय.

मुलीच्या जाण्याने वडिलांना धक्का

मुलीच्या जाण्याने असहाय वडिलांना मोठा धक्का बसला आहे. रविवारी रात्री अश्विनी आणि तिचा मित्र अनिश यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. 160 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या आलिशान पोर्श कारने त्याच्या मोटरसायकलला चिरडले. राजकुमारला १५ तासांत जामीन मंजूर झाला पण दोघांचा जीव गेला. आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी अटक केलीये.