AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाटील… तब्येतीची काळजी घ्या, आंदोलन मागे घ्या, आपण यांना…; रवींद्र धंगेकरांचं मनोज जरांगे यांना काय आवाहन?

Ravindra Dhangekar on Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आंदोलन, सर्वपक्षीय बैठक आणि मनोज जरांगे पाटील यांना आवाहन; आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, पाटील... तब्येतीची काळजी घ्या, आंदोलन मागे घ्या, आपण यांना...

पाटील... तब्येतीची काळजी घ्या, आंदोलन मागे घ्या, आपण यांना...; रवींद्र धंगेकरांचं मनोज जरांगे यांना काय आवाहन?
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 11, 2023 | 3:42 PM
Share

पुणे | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.आमदार रवींद्र धंगेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे. मनोज जरंगे पाटलांना आमची विनंती स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आंदोलन मागे घ्या. तुमच्या मागे तुमचं कुटुंब आहे. आता निवडणुका काही दिवसांवर आहेत. आपण निवडणुकीत या सरकारला उत्तर देऊ, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि सरकारची भूमिका, यावरही रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणावरून राज्य सरकार लोकांना केवळ भूलथापा देत आहे. राज्य सरकारने भंपक आश्वासन देऊ नये. मराठा समाजाला कित्येक वर्ष झाल फक्त आश्वासन दिलं जातं आहे. निवडणुकीच्या वेळी मोदी आणि फडणवीस यांनी मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देवू खोटं सांगितलं होतं. या सरकारला सगळं जड झालं आहे. निवडून आलं की आधी बोललेलंच हे लोक विसरतात, असंही रवींद्र धंगेकर म्हणालेत.

पुण्यात नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसच आंदोलन करण्यात आलं आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील संथ गतीने चालत असलेल्या सर्व्हरच्या समस्येसह इतर मागण्यांसाठी युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात आलं. वेळोवेळी तक्रार करूनही नोंदणी महानिरीक्षक नोंदणी कार्यालयातील सुरू असलेल्या कारभारावर लक्ष देत नाहीत. अनेक ठिकाणी बोगस दस्त नोंदणी सुरू असून देखील अधिकाऱ्यांवर ती कारवाई केली जात नाही, अशी तक्रार या युवकांची आहे. आमदार रवींद्र धंगेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी या आंदोलनासह मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली.

आज सर्वपक्षीय नेत्यांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजची सर्व पक्षीय बैठक आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटायला हवा. त्याअनुषंगाने सरकार योग्यरित्या काम करतंय. कोणावर ही अन्याय न करता, मराठा समाजाला आरक्षण देऊ.यासाठी सर्व घटकांना आणि विरोधी पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?