omicron alert | आता पुणेकरांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन

| Updated on: Dec 05, 2021 | 4:25 PM

जिल्हा प्रशाससाने आतापर्यंत परदेशातून पुण्यात आलेल्या ५९८ लोकांची यादी तयार केली आहे. त्या लोकांच्यासोबत संपर्कही साधण्यात आला आहे. यासगळ्यांना कोणत्या प्रकारची लक्षणे दिसत आहेत का याची चौकशीही केली जात आहे.

omicron alert | आता पुणेकरांना करावे लागणार या नियमांचे पालन
दक्षिण आफ्रिकेतल्या अभ्यासानुसार ओमिक्रॉन ही नैसर्गिक लस असल्याचं सांगण्यात येतंय
Follow us on

पुणे – ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन सर्तक झाले आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण भारतात आढळल्यापासून कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. ओमीक्रॉनचा व्हेरियंट येण्यापूर्वी जिल्हापालक मंत्री आजित पवार यांनी पुण्यात व बैठक घेत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता.

त्यावेळी त्यांनी पुण्यातील चित्रपटगृहांसह , नाट्यगृह सुरु तसेच सांसकृतिक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने आयोजित कराण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी कोरोनाचे आवश्यक ते निर्बंध पाळण्यासही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांनंतर भारतात ओमीक्रॉनचा रुग्ण सापडल्याने राज्य सरकारने कोरोनाच्या नियमावलीत बदल केले. त्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आले.

  या नियमांचे करावं लागेल पालन

  • या पुढे परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची आरआरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट विमानतळावरच केली जाणार आहे.
  • त्याचबरोबरा परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकालासात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे.
  • शहरातील लसीकरणाचा वेग वा वाढवण्यात येणारआहे .
  • शहरातील सरकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्हीडोस घेतलेले असणे बंधनकारक असेल.
  • कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे सक्तीचे असले.
  • प्रत्येक नागरिकाला मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. विना मास्क सापडल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकाराला जाईल.
  • याबरोबरच शहारातील सांस्कृतिक ठिकाणे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहासह केवळ बंदिस्त जागेतच केवळ ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येईल.
  • लग्नांसारख्या कार्यक्रमांना केवळ ५० टक्के उपस्थित राहता येणार आहे.
  • खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी केवळ २५जणच हजार राहू शकणार आहेत.
  • आस्थापनाधारकास नियम न पाळल्यास दहा हजार रुपयांचा होणार दंड आकारण्यात येणार आहे.

 

जिल्हा प्रशाससाने आतापर्यंत परदेशातून पुण्यात आलेल्या ५९८ लोकांची यादी तयार केली आहे. त्या लोकांच्यासोबत संपर्कही साधण्यात आला आहे. यासगळ्यांना कोणत्या प्रकारची लक्षणे दिसत आहेत का याची चौकशीही केली जात आहे.

Nagpur IMA | प्रख्यात भुलतज्ज्ञ डॉ. अशोक जाधव यांचे निधन

omicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी जे करता येईल ते करणार, नियम पाळा, राजेश टोपेंचं आवाहन

Nagpur Omicron | विमानानं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय