छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ खुलं, वढू बुद्रुक ग्रामपंचायतीचं महत्त्वाचं आवाहन

राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे समाधी स्थळे घटस्थापनेपासून सुरू करण्यात आलीत.पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ही दर्शनासाठी खुले करण्यात आलेय.

छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ खुलं, वढू बुद्रुक ग्रामपंचायतीचं महत्त्वाचं आवाहन
छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ


पुणे: कोरोना महामारीमुळे गेली कित्येक दिवसापासून बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे समाधी स्थळे घटस्थापनेपासून सुरू करण्यात आलीत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ही दर्शनासाठी खुले करण्यात आलेय.

कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहनं

छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शंभू भक्तांनी गर्दी करु नये, असं आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीनं आणि पोलीस प्रशासनानं केलं आहे. समाधीचं दर्शन घेताना कोरोना नियमांचे पालन करत समाधीस्थळाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून करण्यात आलेय.

जेजुरीचं खंडोबा मंदिर खुलं

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे गुरुवारी सकाळपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. अनेक दिवसापासून बंद असलेली मंदिरे उघडल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. जेजुरी येथील खंडोबा मंदिरही भाविकांसाठी खुले झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेत मंदिर सुरु करण्यात आलंय. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर देखील भाविकांसाठी खुले झाले आहे. जेजुरी गडावर संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे. भाविकांसाठी खबरदारीचे उपाय देखील या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत. पायरी मार्गावरच सॅन टायझर स्टेशन उभारण्यात आले आहे.

कार्ला एकविरा देवीचे मंदिरही भाविकांसाठी खुलं

लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचे मंदिर अखेर भाविकांसाठी गुरुवारी खुले करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुलदेवी कार्ला येथील एकविरा देवीचे मंदिर गुरुवारीभाविकांसाठी खुले झाल्यानं आनंद व्यक्त करण्यात आला. एकविरा गडावर मास्क, सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंग हे बंधनकारक असणार आहे. गुरुवारी पहाटे 5 वाजता तब्बल दीड वर्षानंतर भाविकांसाठी मंदिरे खुली झाली आहेत. एकविरा गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

इतर बातम्या:

पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला

राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर जाणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका

Pune Sambhaji Maharaj Memorial reopen Shirur Vadhu Budruk Gram Panchayat appeal to follow corona rules

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI