AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे ससून रुग्णालयातील लाच प्रकरणानंतर मोठी कारवाई, मोठ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी

Pune sassoon hospital News : पुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्र लाच प्रकरणामुळे गाजत आहेत. चार दिवसांपूर्वी MBBS च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात डीनला रंगेहात पकडले गेले होते. त्यानंतर आता ससून रुग्णालयातील प्रकरण समोर आले आहे.

पुणे ससून रुग्णालयातील लाच प्रकरणानंतर मोठी कारवाई, मोठ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी
sassoon hospital puneImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2023 | 11:14 AM
Share

योगेश बोरसे, पुणे | 11 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात चार दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला होता. वैद्यकीय प्रवेशासाठी 16 लाख रुपयांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक झाली होती. पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगीनवार यांच्यावर ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयात लाच प्रकरणात एका लिपिकास पकडले गेले. या प्रकरणी ससून रुग्णालयाकडूनही पावले उचलली गेली आहे.

कोणाला लाच घेताना पकडले

वैद्यकीय बिलात त्रुटी न काढण्यासाठी लाच घेणारा ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गणेश सुरेश गायकवाड (वय ४९) याला पकडण्यात आले. अडीच हजारांची लाच घेताना त्याला अटक झाली. ससूनच्या अधीक्षक कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली. तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांचे १ लाख ७ हजार रुपयांचे वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीकरीता प्रलंबित होती. त्यासाठी गायकवाड याने लाच मागितली होती.

आता अधीक्षकाची उचलबांगडी

पुणे ससून रुग्णालयातील लाच प्रकरणात लिपिकाला एसीबीने पकडले. यामुळे या विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक डॉ.यल्लापा जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती केली आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही कारवाई केली. गणेश गायकवाड याला लाच घेताना पकडल्यानंतर तासाभरात ही कारवाई करण्यात आली.

का झाली कारवाई

वैद्यकीय विभागातील वैद्यकीय बिले पास करण्यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. परंतु एखाद्या विभागातील लिपिक हे करु शकत नाही. यामुळे अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात आली. ससूनमध्ये गेल्या दोन वर्षांत तीन, चार अधीक्षक बदलले गेले आहेत. आता जाधव यांचीही उचलबांगडी  झाली आहे. यामुळे रुग्णालयात काय सुरु आहे? हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.