AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरले, विद्यार्थ्याने केला प्राध्यापिकेचा नको तो व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देत…

Pune Crime News : पुणे शहरातून प्राध्यापक अन् विद्यार्थ्यांच्या नात्याला धक्का लावणारा प्रकार घडला आहे. एका विद्यार्थ्याने आपल्याच प्राध्यापिकेचा नको तो व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणात विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे हादरले, विद्यार्थ्याने केला प्राध्यापिकेचा नको तो व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देत...
गोव्यातून बाईक चोरुन कोल्हापुरात विकणाऱ्या दुकलीला अटक
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 25, 2023 | 9:47 AM
Share

पुणे : पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील या प्रकारमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन केले आहे. यामुळे विद्यार्थी अन् प्राध्यापक या नात्याला धक्का बसला आहे. या प्रकाराची तक्रार त्या प्राध्यापिकेने केल्यानंतर बिहारमधील रहिवाशी असलेल्या मयांक सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती अन् तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील नामांकीत विद्यापीठातील विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकाचा हा व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यानंतर तो व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला अन् व्हायरल करण्याची धमकी दिली. यासाठी पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. मुळचा बिहारमधील पाटणा येथील रहिवाशी असलेल्या अन् सध्या पुणे शहरात राहणाऱ्या मयंक सिंग याने हा प्रकार केला आहे. तो आपल्या प्राध्यापिकेशी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमी संपर्कात असायचा. त्यानंतर मोबाईलने संपर्क करु लागला. मग व्हॉट्सअप कॉल करु लागला. मयंकने एकदा प्राध्यापिकेला फोन केला अन् सांगितले की, आपला जो संवाद झाला आहे, तो मी व्हायरल करेल, त्यामुळे मी सांगेल तसे करा.

गुन्हा झाला दाखल

प्राध्यापिकेने घाबरुन मयंक सांगत होते, तसे करणे सुरु केले. त्याने अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. त्याचे त्याने शुटींग केले. मग तो व्हिडिओ महिला प्राध्यपिकेच्या पतीला पाठवला अन् व्हायरल करण्याची धमकी दिली. आपणास पाच हजार अमेरिकन डॉलर दिले नाही तर आपण हा व्हिडिओ व्हायरल करु, असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे प्राध्यापिका अन् तिच्या पतीने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार मार्च २०२० पासून ते २६ जून २०२३ यादरम्यान घडला असल्याची माहिती समोर आलीय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?