AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताई, तुमच्या गावाला जाणारी बस दाखवतो… दत्तात्रय गाडेने महिलेला भुलवलं; पोलिसांचा सर्वात मोठा दावा काय?

पुण्यात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेत मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर कोर्टाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने फिर्यादीला फसवून बसमध्ये अत्याचार केला, असा आरोप आहे.

ताई, तुमच्या गावाला जाणारी बस दाखवतो... दत्तात्रय गाडेने महिलेला भुलवलं; पोलिसांचा सर्वात मोठा दावा काय?
Pune ST Bus Assault
| Updated on: Feb 28, 2025 | 7:44 PM
Share

पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट परिसरातील शिवशाही या एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे तब्बल 72 तासांनी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रय गाडे हा 35 वर्षांचा असून तो शिरुरच्या गुनाट गावात राहतो. मध्यरात्रीच्या अंधारात पोलिसांनी गुनाट गावातून त्याला अटक केली. यानतंर आज त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने दत्तात्रय गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अटक झाल्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले गेले. यानंतर कोर्टाने दोन्हीही बाजूंचा युक्तीवाद ऐकला.

पोलिसांचा युक्तीवाद काय?

आरोपीने ताई म्हणून फिर्यादीला फसवलं. तुमच्या गावाला जाणारी बस कुठे लागते ते दाखवतो असं सांगून बसमध्ये घेऊन गेला. आरोपी सराईत आहे. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहे. त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलाकडे बघणायचा दृष्टीकोन समजतो, असा दावा पोलिसांनी कोर्टात केला.

“आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या”

आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता याचा तपास करायचा आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल दिसून येतोय. त्याचा तपास करायचा आहे. आरोपीचे कपडे जप्त करायचे आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करायचा आहे. आरोपी कोणाच्या संपर्कात होता का? किंवा कोण कोण त्याच्याबरोबर होतं? फरारी काळात आरोपीला कोणी मदत केलीय का??? याचा तपास करायचा आहे. यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली.

पोलिसांनी केलेल्या या मागणीला कोर्टाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यानंतर कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला 12 दिवसांची म्हणजे 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी आरोपीच्या वकिलाकडून कोर्टात अनेक दावे करण्यात आले.

“दोघांच्या सहमतीने हे सगळं झालं”- आरोपीच्या वकिलांचा दावा

“ती मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. त्या मुलीच्या मर्जीने हे संबधं झाले आहेत. दोघांच्या सहमतीने हे सगळं झालं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दोन दिवस कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलाने केली. आरोपीचे फोटो मीडियावर आले आहेत, मग बुरखा खालून का आणले गेले? आरोपीवर गुन्हे दाखल आहेत पण गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याला सराईत म्हणता येणार नाही. हे प्रकरण सोशल मीडियामुळे वाढलं आहे. त्यामुळे 2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी”, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा