पुण्यातील कोरोना टेस्ट करणाऱ्या तीन लॅब सील, कारण काय?

| Updated on: Mar 09, 2021 | 10:51 AM

पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. (Pune three corona lab seal)

पुण्यातील कोरोना टेस्ट करणाऱ्या तीन लॅब सील, कारण काय?
coronavirus
Follow us on

पुणे : कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणाऱ्या पुणे शहरातील लॅब पालिकेकडून सील करण्यात येणार आहेत. या लॅबच्या चुकांमुळे जवळपास 30 टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध लागत नाही. यामुळे पालिकेकडून या लॅब सील करण्यात आल्या आहे. (Pune three corona lab seal)

पुण्यात तीन कोरोना चाचणी लॅब सील 

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. यावेळी संबंधित रुग्णांना त्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागते. मात्र काही नागरिक अपूर्ण माहिती देतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध लागत नाही. त्यामुळे पुण्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती घेणाऱ्या पुणे शहरातील लॅब पालिकेकडून सील करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पुण्यात तीन लॅबमधील कोव्हिड चाचणी सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. (Pune three corona lab seal)

पुणेकरांच्या चिंतेत वाढ

दरम्यान पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ होत आहे. पुणे पालिकेकडून गेल्याच आठवड्यात 42 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. त्यात आता 20 कंटेनमेंट झोनची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कंटेनमेंट झोनची संख्या 62 वर पोहोचली आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 15 पैकी 11 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन औंध-बाणेरमध्ये आहेत. तर सर्वाधिक कोरोना रुग्ण हे शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत. त्यामुळे शिवाजीनगर हा कोरोनाचा हॉट्स्पॉट ठरण्याची शक्यता आहे.

दिवसभरात ७५३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ७०० रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. ०१ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ३५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०९०८३.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६७३५.
– एकूण मृत्यू -४८९७.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९७४५१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६५३४.

सोमवारी (8 मार्च) पुणे शहरात नव्याने 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 01 हजार 005 इतकी झालीय. दुसरीकडे पुणे महापालिका हद्दीत 782 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुणे महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 15 हजार 804 इतकी झाली आहे. पुण्यात मृतांची एकूण संख्या 8 हजार 092 इतकी झाली आहे. सध्या पुण्यात 19 हजार 030 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (Pune three corona lab seal)

संबंधित बातम्या : 

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत आज निर्णय, सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष निर्णयाकडे

Maharashtra Lockdown | ठाण्यातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लागू; मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

Thane Corona | ठाण्यात कोरोनाचा धोका वाढला, ‘हे’ 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट ठरल्यामुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन