Thane Corona | ठाण्यात कोरोनाचा धोका वाढला, ‘हे’ 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट ठरल्यामुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन

ठाण्यातील 16 ठाकणी 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. (Thane municipal corporation corona lockdown)

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 23:56 PM, 8 Mar 2021
Thane Corona | ठाण्यात कोरोनाचा धोका वाढला, 'हे' 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट ठरल्यामुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
corona virus news

 ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असले तरी, येथे कोरोना संसर्गावर म्हणावे तेवढे नियंत्रण मिळवता आलेले नाही. सध्या ठाणे (Thane) शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून येते तब्बल 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारी म्हणून या 16 ठिकाणीी 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याविषयी महापालिकेने अध्यादेश काडून त्याची याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. (municipal corporation clarified that lockdown will continue till March 31 in 16 places Thane)

ठाण्यात 16 ठिकाण कोरोना हॉटस्पॉट

ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. तशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

या परिसरामध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, आईनगर, सुर्यनगर, खारेगाव परिसर हा भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तर, परिमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, वागळे आणि श्रीनगर हा भाग कोरोना हॉटस्पॉट आहे. परिमंडळ 3 मध्ये सर्वाधिक  हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकुम, लोढा, लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले या भागाचा समावेश आहे. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी हा परिसरसुद्धा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता ठाण्यातील बाकीच्या परिसरातील व्यवहार राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार चालतील.

दरम्यान, ठाण्यात आज दिवसभरात 149 जणांना कोरोनाची लागण झाली. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 62,830 एवढी आहे. येथे आतापर्यंत 60,578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 95.9 टक्के एवढे आहे. सध्या ठाण्यात 1,911 रुग्णांवर सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.

(municipal corporation clarified that lockdown will continue till March 31 in 16 places Thane)

इतर बातम्या :

महाराष्ट्राची स्थिती धोकादायक वळणावर, राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत