मुंबईत उडान फाऊंडेशन सरकारी दरात घरच्या घरी कोरोना चाचणी करणार, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

'उडान फाऊंडेशन' नागरिकांना कोरोना चाचणी घरच्या घरी उपलब्ध करून देणार आहे (Mumbai Corona tests).

मुंबईत उडान फाऊंडेशन सरकारी दरात घरच्या घरी कोरोना चाचणी करणार, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 8:03 PM

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईत (Mumbai Corona tests) दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ‘उडान फाऊंडेशन’ नागरिकांना कोरोना चाचणी घरच्या घरी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे नागरिकांना लॅबमध्ये जावून ताटकळत वाट बसावी लागणार नाही. त्याचबरोबर नागरिकांचा वेळही वाचेल.

खासदार राहुल शेवाळेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील नागरिकांसाठी ‘उडान फाऊंडेशन’च्या वतीने ‘कोविड ट्रॅकर’ हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे (Mumbai Corona tests) . खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा कामिनी राहुल शेवाळे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाविषयी मार्गदर्शन आणि विविध चाचण्या या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरच्या घरी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मदत कशी घ्यावी?

“कोविड ट्रॅकरच्या 9923991075 या हेल्पलाईन वर संपर्क साधल्यास नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे समुपदेशन मिळेल. तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णाच्या घरी जाऊन पुढील चाचण्या आणि औषधोपचार दिले जातील. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदत केली जाईल. या सर्व सुविधा शासकीय दरात आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार पुरविण्यात येतील”, अशी माहिती कोविड ट्रॅकरच्या वतीने देण्यात आली.

राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया

“उडान फाऊंडेशनच्या वतीने सूरु करण्यात आलेल्या ‘कोविड ट्रॅकर’ हेल्पलाईन सुविधेला माझ्या शुभेच्छा! या हेल्पलाईनमुळे रुग्णालयात न जाता घरच्या घरी कोविड चाचणी करणे नागरिकांना शक्य होईल. तसेच काही प्रमाणात सरकारी वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊ शकेल. दक्षिण-मध्य मुंबईतील गरजू रुग्णांना या योजनेत सामावून घेण्यासाठी ‘राधा फाऊंडेशन’च्या वतीने सहकार्य करण्यात येईल”, अशी प्रचतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.

हेही वाचा : Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.