Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:47 PM, 8 Mar 2021
Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिलाय. दररोज वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आवश्यक असल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती शेख यांनी दिली. विशेष म्हणजे अस्लम शेख यांच्या या विधानाआधी आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना संसर्गाबाबत एक प्रेझेंटेशन दिलं. यावेळी वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यावर मुख्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत अंशतः लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही चर्चा झाली (Guardian Minister warn about partial lockdown in Mumbai amid increasing Corona Patient).

सध्या महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या जवळ जातेय. सध्या महाराष्ट्रात 97 हजार 983 सक्रीय रुग्ण आहेत. एकट्या मुंबईत 10 हजार 779 सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच मुंबईने कधीच 10 हजारांचा टप्पा पार केलाय अशी स्थिती आहे. सध्याचा कोरोना संसर्गाचा वेग पाहता एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या लवकरच 2 लाखापर्यंत जाईल, अशीही भीती व्यक्त केली जातेय.

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता केंद्रातील पथकानेही याची पाहणी केली आहे. यानंतर आणखी एक तज्ज्ञांची समिती महाराष्ट्रात येऊन याची पाहाणी करणार आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची स्थिती काय?

राज्याची राजधानी मुंबईत 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 10 हजार 779 इतकी आहे. याशिवाय 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 956 आहे. आजवर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 11 हजार 407 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर 225 दिवस आहे. तसेच कोविड वाढीचा दर (1 मार्च-7 मार्च) 0.31 टक्के आहे.

हेही वाचा :

धोका वाढला! नव्या कोरोना रुग्णांची फुफ्फुस लवकर होतायत खराब

…तर कॅटरिंग व्यावसायिकांसाठी सवलतीचा विचार होऊ शकतो : किशोरी पेडणेकर

विनामास्क मुंबईकर बीएमसीच्या रडारवर, एका दिवसात 27 लाखांची दंडवसुली

व्हिडीओ पाहा :

Guardian Minister warn about partial lockdown in Mumbai amid increasing Corona Patient