…तर कॅटरिंग व्यावसायिकांसाठी सवलतीचा विचार होऊ शकतो : किशोरी पेडणेकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona) 

  • विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 18:32 PM, 22 Feb 2021
...तर कॅटरिंग व्यावसायिकांसाठी सवलतीचा विचार होऊ शकतो : किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे विवाहसोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करणारे मंडप डेकोरेटर, कॅटरिंग क्षेत्रातील व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. मात्र पालिकेकडून सुरु असलेल्या धाडसत्रामुळे अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona)

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालिकेने काही धाडसत्र सुरु केले आहेत. या धाडसत्रामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे व्यावसायिक पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाने किशोर पेडणेकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली.

“सगळ्या मंगल कार्यालयाच्या प्रमुखांनी निवेदन दिलं आहे. हॉलच्या 50 टक्के क्षमतेने लोकांना प्रवेशाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हॉलमध्ये किमान 25 ते 30 कुटुंब अवलंबून असतात. हातावरची पोट असणारी लोक काही आहेत. त्यामुळे ते सवलत मागत आहे. पण निर्णय राज्य शासनाचा आहे,” असे मंडप डेकोरेटर, कॅटरिंग क्षेत्रातील व्यावसायिक चर्चेदरम्यान म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी दिलेले अल्टिमेटम पाळावं लागेल”

“याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलेन. मात्र मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं पाळाव लागणार आहे. रुग्ण संख्या वाढली नाही. तर सवलतीचा विचार होऊ शकतो,” असे किशोर पेडणेकर म्हणाल्या.

“आजच नांगरे पाटील यांनी डिपार्टमेंटला आदेश दिलेले आहेत. यानुसार 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत,” असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

“लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविन अ‍ॅपचं विकेंद्रीकरण करा”

“कोविन अ‍ॅपचं विकेंद्रीकरण करा. कोविन अ‍ॅपची सगळी सूत्र केंद्राच्याच हातात आहेत. कोविन अ‍ॅप 5-5 दिवस बंद राहतं. लसीकरणाच्या सगळ्या सुविधा असूनही आम्हाला केवळ कोविन अ‍ॅपमुळे लस देता येत नाही. केंद्राचं महाराष्ट्र, मुंबईवर प्रेम आहे त्यामुळे लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविन अ‍ॅपचं विकेंद्रीकरण करावं,” असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला.  (Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona)

संबंधित बातम्या : 

धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

‘कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको, अधिवेशनाबाबतही तोच मानस’, विरोधी पक्षनेत्यांचं सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह