‘कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको, अधिवेशनाबाबतही तोच मानस’, सरकारच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांचं प्रश्नचिन्ह

अधिवेशनाबाबत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.

'कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको, अधिवेशनाबाबतही तोच मानस', सरकारच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांचं प्रश्नचिन्ह
प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 6:26 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं रोज येणाऱ्या आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. पण भाजपकडून मात्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. लॉकडाऊन आणि निर्बंध टाकण्याचा प्रयत्न करत जसं कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको. तसाच अधिवेशनाबाबत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.(Praveen Darekar’s serious allegations against the Thackeray government)

महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. वीज खंडीत केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, असा आरोप करत दरेकर यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे आहेत. त्याबाबत समाजातील प्रत्येक घटकांत असंतोष आहे. तो असंतोष आंदोलन आणि मोर्चाच्या रुपातून बाहेर येत, असल्याचा दावाही दरेकर यांनी केलाय.

प्रश्नांपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न- दरेकर

शिक्षक आंदोलन, आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मराठा समाजाचं आंदोलन असे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील. त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नांबाबत पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने नागपूरचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतलं होतं. त्याचा कालावधीही कमी केला होता. तेव्हाही भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

निलेश राणेंचाही हल्लाबोल

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलाय. अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय. त्याचबरोबर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

महाविकास आघाडीचं कृषी विधेयकावर मुंबईत आंदोलन झालं त्याला गर्दी होती. 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, विजयी मिरवणुका निघाल्या, त्याला गर्दी होती. आता लोकल ट्रेलचं कारण सांगत आहेत. लोकल काय आताच सुरु झाल्या का?. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारमधील अनेक मंत्री कुठल्या तरी भानगडीत अडकले आहेत. त्यावर विरोधक फाडून खातील. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ना मुख्यमंत्री समर्थ आहेत ना उपमुख्यमंत्री, अशा शब्दात निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तोंडसुख घेतलं.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना झालेला कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय? : नितेश राणे

विकासाच्या मागे लागताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये : उद्धव ठाकरे

Praveen Darekar’s serious allegations against the Thackeray government

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.