भयंकर! अचलपूरमध्ये घरोघरी कोरोना रुग्ण; रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्याने होम आयसोलेशनही बंद

भयंकर! अचलपूरमध्ये घरोघरी कोरोना रुग्ण; रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्याने होम आयसोलेशनही बंद

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूरमध्ये कोरोनाची प्रचंड संख्या वाढली आहे. परतवाडा आणि अचलपूर तालुक्यात घरोघरी रुग्ण आढळत आहेत. (coronavirus cases rise in achalpur, home isolation cancelled)

भीमराव गवळी

|

Feb 22, 2021 | 5:33 PM

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूरमध्ये कोरोनाची प्रचंड संख्या वाढली आहे. परतवाडा आणि अचलपूर तालुक्यात घरोघरी रुग्ण आढळत आहेत. अचलपूरमध्ये तर रुग्ण संख्या हाताबाहेर गेल्याने होम आयसोलेशन बंद करण्यात आलं आहे. दोन्ही तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले असून संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच आज रात्रीपासूनच कडक लॉकडाऊनची अमलबजावणी करण्यात येणार आहे. (coronavirus cases rise in achalpur, home isolation cancelled)

पावणे दोन लाख लोकसंख्या

अचलपूरमध्ये एकूण 53 पुरे (मोहल्ले) आहेत. अब्बासपुरा, सुल्तानपुरा अशी या मोहल्यांची नावं असून मुस्लिम शासकांच्या नावावरून ही नावे देण्यात आली आहे. अचलपूरमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अचलपूर आणि परतवाडा तालुका हा मध्यप्रदेशच्या अगदी सीमेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी मध्यप्रदेशातील लोक सातत्याने ये-जा करत असतात. अचलपुर तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 45 हजार एवढी आहे.

नवा स्ट्रेन माहीत नाही, नागरिक बिनधास्त

कोरोनाचा नवा स्ट्रेन हा घातक आहे याची जाणीव अधिकार्‍यांनी जनतेला करून दिलीच नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच या दोन्ही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पसरला असून घरोघरी कोरोना रुग्ण दिसत आहेत. अचलपूरमधून कोरोना रुग्ण उपचारादरम्यान पळून गेले होते. तेव्हासुद्धा प्रशासन गंभीर नव्हतेच. तर हळूहळू रुग्ण संख्या वाढत असतानाही प्रशासनाने जनतेला सतर्कतेचा कोणताही इशारा दिला नाही. त्यामुळे आज परिस्थीती हाताबाहेर गेली आहे. मात्र, आता आम्ही काळजी घेऊ आणि लॉकडॉऊनच्या नियमांची कटकोर अमलबजावणी करू अशी प्रतिक्रिया अचलपूरकरांनी दिली आहे.

चाचण्या वाढवल्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचलपूरमध्ये 1 फेब्रुवारी पासून आतापर्यंत 17536 कोविड चाचण्यात करण्यात आल्या आहेत. त्यात 370च्यावर लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. अचलपूरमध्ये सध्या 33 जणांवर उपचार सुरू आहेत.

रुग्ण कुटुंबासोबतच राहिले

17 फेब्रुवारीपर्यंत 80 घरांमध्ये संशयित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र पॉझिटिव्ह रुग्ण घरामध्ये वेगळे राहण्याऐवजी कुटुंबासोबत राहिल्यानेच घरातील इतर सदस्य पॉझिटिव्ह झाले. इतकेच नाही तर घरातील बाधित सदस्यच बाजार, दुकान, मेडीकल आदी ठिकाणी जाऊन खरेदी करू लागल्याने संपर्कातील अनेक बाधित होत गेले. त्यामुळे मोठ्याप्रणात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येताच होम आयसोलेशन बंद करण्यात आलं. (coronavirus cases rise in achalpur, home isolation cancelled)

21 दिवसात 45 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 21 दिवसांत 7545 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. 21 दिवसांत कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 463 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22,03,669 नमुण्यांची तपासणी करण्यात आली असून 27,901 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. (coronavirus cases rise in achalpur, home isolation cancelled)

संबंधित बातम्या:

ठाण्यात आता कोरोनाचे नियम न पाळल्यास थेट दुकाने, आस्थापना सील; पालिका आयुक्तांचे फर्मान

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

(coronavirus cases rise in achalpur, home isolation cancelled)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें