ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

Thackeray Govt Corona Case | महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 17 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 6 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 10:34 AM

मुंबई: ठाकरे सरकारमध्ये कोरोनाने हाहाकार. (Thackeray Govt Corona Case) आम्ही असं म्हणण्याचं कारण म्हणजे, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना ( Ministers In Mahavikas Aaghadi Govt ) झालेल्या कोरोना संक्रमनाची यादी पाहिली तर राज्यात कोरोना ज्या वेगाने पसरला नसेल, त्याहूनही अधिक वेगाने कोरोना राज्याच्या मंत्रिमंडळात ( Maharashtra State Cabinet Corona)  पसरलेला पाहायला मिळतो आहे. कारण, दर 2 दिवसाआड कुठले ना कुठले मंत्रिमहोदय कोरोना संक्रमित होतात आणि ट्विटरवर याची माहिती देतात. महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. म्हणजेच 43 पैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काहीजण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. (List of Corona-infected ministers in the Thackeray government)

सध्या कुठल्या मंत्र्यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे बडे नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. आज म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu corona positive) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा 19 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी उपचारानंतर ते क्वारंटाईन होते. त्यावेळी बच्चूभाऊंसाठी प्रार्थना करणाऱ्या एका लहानग्याचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला होता. दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या मुंबईतील घरातील दोन जण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे.

आता कोरोना संक्रमित मंत्र्यांची यादी पाहा

कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री

कॅबिनेट मंत्री

  1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त़
  2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
  3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
  4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
  5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
  6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  9. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) – 24 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  10. वर्षा गायकवाड – शिक्षणमंत्री (काँग्रेस) – 22 सप्टेंबर – कोरोनामुक्त
  11. अनिल परब – परिवहनमंत्री (शिवसेना) – 12 ऑक्टोबर – कोरोनामुक्त
  12. अजित पवार – उपमुख्यमंत्री, (राष्ट्रवादी ) – 26 ऑक्टोबर 2020 – कोरोनामुक्त
  13. दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री – कोरोनामुक्त
  14. जयंत पाटील – जलसंपदा मंत्री – 18 फेब्रुवारी 2021 – कोरोना संसर्ग
  15. राजेश टोपे – आरोग्य मंत्री – 18 फेब्रुवारी 2021 – कोरोना संसर्ग
  16. अनिल देशमुख – गृहमंत्री – 5 फेब्रुवारी 2021- कोरोनामुक्त
  17. राजेंद्र शिंगणे – अन्न आणि औषध प्रशासन मंत्री – 16 फेब्रुवारी 2021- कोरोना संसर्ग
  18. एकनाथ खडसे – माजी मंत्री – 18 फेब्रुवारी 2021- कोरोना संसर्ग

राज्यमंत्री

  1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
  2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
  3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020- कोरोनामुक्त
  5.  बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020-कोरोनामुक्त
  6.  सतेज पाटील – गृहराज्यमंत्री – 9 फेब्रुवारी 2021- कोरोनामुक्त
  7. दत्तात्रय भरणे, जलसंपदा राज्यमंत्री

*बच्चू कडू – शालेय शिक्षण राज्यमंत्री – 19 फेब्रुवारी 2021- दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग

ठाकरेंच्या अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण

महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. काहींना तर दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला. म्हणजेच 55 टक्के मंत्री कोरोनाच्या तावडीत सापडले. तर राज्यमंत्री आहेत 10 त्यांच्यापैकी 7 मंत्र्यांनी कोरोना झाला, म्हणजेच महाविकास आघाडीतील राज्यमंत्र्यांना कोरोना होण्याचं प्रमाण तब्बल 70 टक्के आहे. या दोघांची मिळून टक्केवारी काढली तर एकूण मंत्रिमंडळापैकी 50 टक्क्यांहून अधिक मंत्रिमंडळ कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं दिसतं.

आता कुठल्या मंत्र्यांनी कोरोनाला थोपवलं?

कॅबिनेट

  1. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
  2. सुभाष देसाई, उद्योग मंत्री
  3. छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री
  4. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
  5. विजय वडेट्टीवार, मागासवर्ग मंत्री
  6. अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री
  7. दादा भुसे, कृषि मंत्री
  8. संजय राठोड, वनमंत्री
  9. गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा मंत्री
  10. के. सी. पाडवी, आदिवासी विकास
  11. संदिपान भुमरे, रोजगार हमी
  12. यशोमती ठाकूर, महिला आणि बालविकास मंत्री
  13. शंकरराव गडाख, सामाजिक न्याय मंत्री
  14. आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री

राज्यमंत्री

  1. शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
  2. राजेंद्र पाटील याड्रावकर, सार्वजनिक आरोग्य
  3. आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री

संबंधित बातम्या:

राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह

7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील ‘कोव्हिड योद्धे’ मंत्री

(List of Corona-infected ministers in the Thackeray government)

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.