राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह

राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह
मंत्रालय

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra corona cases) पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. नव्याने कोरोना होणाऱ्यांमध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.

सचिन पाटील

|

Feb 19, 2021 | 12:06 PM

मुंबई : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra corona cases) पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. नव्याने कोरोना होणाऱ्यांमध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu corona positive) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या मुंबईतील घरातील दोन जण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे.

बच्चू कडूंना यापूर्वीही संसर्ग

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा 19 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी उपचारानंतर ते क्वारंटाईन होते. त्यावेळी बच्चूभाऊंसाठी प्रार्थना करणाऱ्या एका लहानग्याचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला होता.

ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ते ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष आहेत. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला आणि बाल विकास, कामगार या मंत्रालयांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे अकोल्याच्या पालकमंत्रिपदाचीही धुरा आहे. 

कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री

कॅबिनेट मंत्री

 1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त
 2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
 3.  धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
 4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
 5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
 6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
 7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
 8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
 9. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) –  24 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
 10. वर्षा गायकवाड – शिक्षणमंत्री (काँग्रेस) – 22 सप्टेंबर –  कोरोनामुक्त
 11. अनिल परब – परिवहनमंत्री (शिवसेना) – 12 ऑक्टोबर – कोरोनामुक्त
 12. अजित पवार – उपमुख्यमंत्री, (राष्ट्रवादी ) – 26 ऑक्टोबर 2020 – कोरोनामुक्त
 13.  जयंत पाटील – जलसंपदा मंत्री – 18 फेब्रुवारी
 14.  राजेश टोपे – आरोग्य मंत्री – 18 फेब्रुवारी
 15. अनिल देशमुख – गृहमंत्री  –  5 फेब्रुवारी
 16. राजेंद्र शिंगणे – अन्न आणि औषध प्रशासन मंत्री – 16 फेब्रुवारी

एकनाथ खडसे – माजी मंत्री – 18 फेब्रुवारी

 राज्यमंत्री

1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त 2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त 3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त 4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त 5. बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त 

6) सतेज पाटील – गृहराज्यमंत्री  (काँग्रेस) – 9 फेब्रुवारी 2021-

7) बच्चू कडू – शालेय शिक्षण राज्यमंत्री – 19 फेब्रुवारी 2021

संबंधित बातम्या –

7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील ‘कोव्हिड योद्धे’ मंत्री

चहा प्यायल्यानंतर कप फोडला, डोळ्यात पाणी येत होतं, बच्चू कडूंनी अनुभवलेले कोरोनाचे 3 दिवस

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें