Pune Crime | आधी हॉटेलमध्ये वाद, नंतर लिफ्ट देण्याच्या बाहाण्याने युवतील नेले लॉजवर, पुढे…

Pune Crime News | पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पुणे शहर सुरक्षित शहर राहिले नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. एका खासगी कंपनीत मॅनेजर असलेल्या युवतीसंदर्भात घडलेल्या या प्रकारामुळे...

Pune Crime | आधी हॉटेलमध्ये वाद, नंतर लिफ्ट देण्याच्या बाहाण्याने युवतील नेले लॉजवर, पुढे...
| Updated on: Oct 01, 2023 | 4:13 PM

पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रात्री धक्कादायक प्रकार घडला. विमाननगर सारख्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडली आहे. रात्री एका खासगी कंपनीत मॅनेजर असलेल्या ३२ वर्षीय युवतीला लिफ्ट देण्याच्या बाहाण्याने २६ वर्षीय युवकाने गाडीवर बसवले. त्यानंतर घरी न सोडता लॉजवर नेले. त्यानंतर जे घडलेले त्यामुळे पुणे शहर सुरक्षित शहर राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय झाला प्रकार

पुणे शहरातील ३२ वर्षीय युवती खासगी कंपनीत मॅनेजर आहे. ती विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफेमध्ये मित्रांसह जेवण्यासाठी गेली. तिच्यासोबत तिची मैत्रीण आणि दोन मित्र होते. कॅफेमध्ये दहा हजार रुपयांचे बिल झाले. परंतु त्या तरुणीचा डेबिट कार्ड चालला नाही. यामुळे कॅफेचे व्यवस्थापक आणि कामगारांनी तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्याकडील दोन मोबाइल, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि डेबिट कार्ड त्यांनी जप्त केले. पैसे दिल्यावर हे परत मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी तिच्या मित्रांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

पुढे तरुणाने लिफ्टचा बाहाणा केला….

रात्री दीड वाजता घडलेल्या या प्रकारानंतर ती घरी जाण्यास निघाली. त्यावेळी पार्ट टाईम जॉब करणाऱ्या २६ वर्षीय दत्तात्रय खरात याने तिला आपण घरी सोडतो, असे सांगिलते. मात्र गाडीवर बसवून घराकडे न नेता तिला खराडीतील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी तिच्या नावाने रुम घेत बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी आरोपीला केली अटक

युवतीने दत्तात्रय खरात विरुद्ध तक्रा दिल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.