Pune Mahametro | पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्नपूर्ण ; असा करता येणार प्रवास

मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना पहिल्या तीन स्थानकांपर्यंत 10  रुपये तिकिटाचे असणार आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20  रुपये तिकीट दर असणार आहेत. यामध्ये वनाझ ते आयडियल कॉलनी या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागणार. वनाझ ते एसएनडीटी किंवा गरवारे महाविद्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी 20  रुपये तिकीट पिंपरी ते भोसरी (नाशिक फाटा) प्रवासासाठी 10  रुपये तिकीट.

Pune Mahametro | पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्नपूर्ण ; असा करता येणार प्रवास
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 04, 2022 | 2:51 PM

पुणे – मेट्रोतून प्रवास (Metro ) करण्याचे पुणेकरांचे (Pune) स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. येत्या रविवारी (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांना त्याच दिवशी मेट्रोतून सफर करता येणार आहे. एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. दिवसभरात 13 तास मेट्रो पुणे आणि पिंपरीत धावणार असून, सध्या दर अर्ध्या तासाने त्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (महामेट्रो) कडून लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे.

मेट्रोचे वेळापत्रक –

उद्घाटनानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत मेट्रो सामान्य प्रवाशांसाठी धावणार.  सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.

असे असतील तिकिटाचे दर

मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना पहिल्या तीन स्थानकांपर्यंत 10  रुपये तिकिटाचे असणार आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20  रुपये तिकीट दर असणार आहेत. यामध्ये वनाझ ते आयडियल कॉलनी या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागणार. वनाझ ते एसएनडीटी किंवा गरवारे महाविद्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी 20  रुपये तिकीट पिंपरी ते भोसरी (नाशिक फाटा) प्रवासासाठी 10  रुपये तिकीट. पिंपरी ते फुगेवाडी प्रवासासाठी 20 रुपये तिकीट प्रवासी क्षमता मेट्रोच्या एका डब्यात 325  प्रवासी क्षमता सध्या मेट्रो तीन डब्यांची; 975  प्रवासी करू शकणार एक डबा महिलांसाठी असेल राखीव असणार आहे.

Aurangabad | रनवेवर खोकड अन् विमान हवेतच गोल गोल, औरंगाबादेत लँडिंग करताना विचित्र खोडा

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात काय घडलं? पाहा फोटोस्टोरी

एसटी महामंडळाचं विलीनिकरण शक्य नाही, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत