AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | रनवेवर खोकड अन् विमान हवेतच गोल गोल, औरंगाबादेत लँडिंग करताना विचित्र खोडा

खोकड हा कोल्ह्यासारखा दिसणारा मांसाहारी प्राणी आहे. तो मोकळ्या मैदानात राहतो. वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडुपं असलेल्या भागात राहतो.

Aurangabad | रनवेवर खोकड अन् विमान हवेतच गोल गोल, औरंगाबादेत लँडिंग करताना विचित्र खोडा
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 2:24 PM
Share

औरंगाबादः एखादा लहानसा प्राणीही (Small Animal) अवघी यंत्रणा कशी वेठीस धरू शकतो, याचा दाखला गुरुवारी औरंगाबादेत मिळाला. औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळाच्या (Aurangabad Air port) धावपट्टीवर एका खोकडाने संपूर्ण व्यवस्थापनाची भंबेरी उडवली. मुंबईहून औरंगाबादेत आलेलं विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी सज्ज होतं. पण इकडे धावपट्टीवर (Runway) ठिय्या मारून बसलेले खोकड होते. एवढाचा प्राणी पण त्याला हुसकावून लागण्यासाठी अधिकाऱ्यांना बराच घाम गाळावा लागला. तोपर्यंत 66 प्रवाशांना घेऊन आलेले विमान आकाशातच गोल गोल फिरत बसले. अखेर या खोकडाला पळवून लावण्यात अधिकाऱ्यांना यश आले आणि प्रवाशांसह अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

कधी, कसा घडला प्रकार?

झालं असं की, गुरुवारी दुपारी 4.20 च्या सुमारास मुंबईहून 66 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान औरंगाबादेत आले. आकाशातून औरंगाबादमधून विमानतळावर उतरण्याची परवानगी मागण्यात आली. मात्र त्याला ट्राफिक कंट्रोल रुमने उतरण्यास परवानगी दिली नाही. कारण धावपट्टीवर एका खोकडाने ठिय्या मारला होता. ट्राफिक कंट्रोलने ही माहिती विमानतळ प्राधिकरणाला कळवली. ही माहिती मिळताच सायरन वाजवत प्राधिकरणाच्या गाड्यांनी रनवे गाठला. खोकडाला हुसकावण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि अधिकारी सरसावले. त्यानंतर हे खोकड इकडे-तिकडे पळू लागले. तब्बल 10 ते 15 मिनिटे ही पळापळ झाली. त्यानंतर खोकडाला हुसकावून लागवण्यास अधिकाऱ्यांना यश आले. तोपर्यंत हे विमान हवेतच गोल गोल फिरत बसले.

खोकड गेल्यानंतर विमान धावपट्टीवर

खोकडाला हुसकावून लावल्यानंतर 66 प्रवाशांना घेऊन आलेले हे विमान सुरक्षितरितीने धावपट्टीवर उतरवण्यात आले. त्यानंतरच अधिकाऱ्यांनी निःश्वास सोडला. एक लहानसा प्राणीदेखील अवघी यंत्रणा कशी वेठीस धरू शकतो, हेच औरंगाबादमधील प्रसंगावरून दिसून आले.

खोकड प्राणी नेमका कसा?

खोकड हा कोल्ह्यासारखा दिसणारा मांसाहारी प्राणी आहे. तो मोकळ्या मैदानात राहतो. वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडुपं असलेल्या भागात राहतो. जमिनीत, कालव्यांच्या आशपास किंवा खडकाळ जमिनीत बिळं करून राहतो. खोकड हा निशाचर प्राणी असून दिवसा झोप घेतो आणि संध्याकाळी भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतो. अंधार दाटून आल्यावर तो ओरडतो. लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक तसेच कलिंगड, बोरे, हरभऱ्याचे घाटे हे त्याचे अन्न आहे.

इतर बातम्या-

एसटी महामंडळाचं विलीनिकरण शक्य नाही, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत

गोंदियातील सेजगावमध्ये महिला डॉक्टरने घेतला गळफास, किरायाच्या घरात का घेतला अंतिम श्वास?

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.