AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : उद्याच्या राज गर्जनेला पुणे पोलिसांच्या 13 अटी, पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? अटी काय? तेही वाचा

या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत.

Raj Thackeray : उद्याच्या राज गर्जनेला पुणे पोलिसांच्या 13 अटी, पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? अटी काय? तेही वाचा
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 21, 2022 | 6:58 PM
Share

पुणे : पुण्यात उद्याच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय. राज ठाकरेंची ही सभा (Pune MNS) गेल्या तीन सभांसारखीच वादळी होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची बीकेसीत सभा पार पडली या सभेत त्यांनी राज ठाकरेंना पिक्चरमधल्या मुन्नाभाईची उपमा देत खिल्ली उडवली. तर बाळासाहेब झाल्यासरखे वाटणार अनेकजण सध्या फिरत आहे. कध हिंदुत्वाचा मुद्दा घेतात. कधी मराठीचा, म्हणत राज ठाकरे यांना थेट डिवचलं होतं. त्यामुळे राज ठाकारे पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगिती केला. त्यावरही ते खुलेपणे बोलणार आहेत. या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत. औरंगाबादेतल्या सभेलाही स्थानिक पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या मात्र यातल्या अनेक अटींचं पालन न झाल्याने राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पुण्यात तरी अटींचं पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला अटी काय?

  1. समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत ही पहिली अट आहे.
  2. सभेत रुढी, परंपरा, वंश यावरून चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी ही दुसरी अट आहे.
  3. सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे, अशी तिसरी अट पुणे पोलिसांनी घातली आहे.
  4. कार्यक्रमात शस्त्र, तलवारी, बाळगू नये, तसेच कायदेशीर नियमांचं पालन व्हावं, असे पोलिसांनी बजावलं आहे.
  5. सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असणार आहे.
  6. सभेमध्ये येणाऱ्या लोकांनी स्वयंशिस्त पाळावी, ही सहावी अट आहे.
  7. या सभेचे नियम पाळावे हे लोकांना कळवण्याची जबाबादारी ही आयोजकांवर असणार आहे.
  8. सभेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास, किंवा चेंगराचेंगरी झाल्यास याला आयोजक जबाबदार असणार आहे.
  9. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत बदल करता येणार नाही.
  10. व्यासपिठावरील संख्या ही निश्चित असावी आणि ती पोलिसांना कळवण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
  11. स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
  12. कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका, वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  13. सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान