सरकार शेतकऱ्यांशी चर्चेच नाटक करुन टाईमपास करतंय, हे ओळखून सुप्रीम कोर्टानं केंद्राला झापलं: राजू शेट्टी

| Updated on: Jan 11, 2021 | 5:34 PM

55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. (Raju Shetti Farmer Protest)

सरकार शेतकऱ्यांशी चर्चेच नाटक करुन टाईमपास करतंय, हे ओळखून सुप्रीम कोर्टानं केंद्राला झापलं: राजू शेट्टी
राजू शेट्टी, माजी खासदार
Follow us on

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलनालवर शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत.  तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीका केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्ठा चालवली होती, असंही ते म्हणाले. (Raju Shetti criticize Central Government over bad handling Farmer Protest)

केंद्रातल्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना हे खालिस्तानी आहेत, त्यांना पाकिस्तानचा व चीनचा पाठिंबा हे अशी मुक्ताफळे उधळली आहेत. मात्र आज खऱ्या अर्थानं न्याय देवतेने शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितले. आज खऱ्या अर्थान न्याय व्यवस्थेने सरकारला झापले असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

55 शेतकऱ्यांचा जीव जाऊनही सरकारला जाग नाही

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरु आहे. या आंदोलनात 55 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीसुद्धता या सरकारला जाग आली नाही, असा आरोप राजू शेट्टींनी केला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापले. यामुळे न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली नसल्याचं स्पष्ट झालं, असंही राजू शेट्टी म्हणाले. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनबाबात नाटक करत आहे. टाईमपास करत आहे, सुप्रीम कोर्टाने हे सगळं ओळखून केंद्र सरकारला चांगलेच झापले असल्याचे राजू शेट्टींना सांगितले.

दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा

सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच न्यायालयाने शेतकरी आंदोलनाच्या हाताळणीवरुन केंद्र सरकारला फटकारले. तुम्ही हा मुद्दा योग्यरित्या हाताळला नाही. त्यामुळे आम्हाला काहीतरी कृती करणे भाग आहे. तसेच कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती दिल्यास शेतकऱ्यांशी चर्चा करणे सोपे जाईल, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटले. आता सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायालयाकडून शेतकरी आंदोलन कृषी कायद्यांना स्थगिती द्यायची की नाही, यासंदर्भात महत्त्वाचा निकाल सुनावला जाईल.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

‘सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही’, शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

(Raju Shetti criticize Central Government over bad handling Farmer Protest)