AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष तर नातू साखर कारखान्याचा अध्यक्ष, ऑडिट कसं होणार? राजू शेट्टींचा इशारा कुणाकडे?

आयुक्तांचा दावा आहे की राज्यातले सर्व कारखाने आज बंद झालेत, गाळपाचा ऊस राज्यात शिल्लक नाही, असा दावा केलाय, आम्ही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांकडून या दाव्याची सत्यता तपासू, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर त्यांनी कारखान्यांच्या ऑडिटवरूनही सूचक विधान केलं आहे. 

Raju Shetty : आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष तर नातू साखर कारखान्याचा अध्यक्ष, ऑडिट कसं होणार? राजू शेट्टींचा इशारा कुणाकडे?
आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष तर नातू साखार कारखान्याचा अध्यक्ष, ऑडिट कसं होणार? राजू शेट्टींचा इशारा कुणाकडे?Image Credit source: tv9 marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 15, 2022 | 4:32 PM
Share

पुणे : आजच उसाचा गाळप हंगाम (Sugarcane) संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा विक्रमी उसाचे गाळप झाल्याचेही साखर आयुक्तींनी सांगितले आहे. तर दुसरीकडे कारखान्यांच्या ऑडिटच्या प्रश्नावरून आणि एफआरपीच्या मुद्द्यांवरून राजू शेट्टी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर राजू शेट्टी (Raju Shetty) हे साखर आयुक्त शेखर गाडकवाड यांचीही भेट घेतली आहे. शिल्लक ऊस , थकीत एफ. आर. पी यासह विविध विषयांच्या संदर्भात ते आयुक्तांशी त्यांनी चर्चा केलीय. महाराष्ट्रात शिल्लक ऊस किती? बंद साखर कारखान्यांनी (Sugar Factory) किती इथेनॉल निर्मिती केली याची साखर आयुक्तांकडून माहिती घेतली, तसेच साखर आयुक्तांचा दावा आहे की राज्यातले सर्व कारखाने आज बंद झालेत, गाळपाचा ऊस राज्यात शिल्लक नाही, असा दावा केलाय, आम्ही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांकडून या दाव्याची सत्यता तपासू, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर त्यांनी कारखान्यांच्या ऑडिटवरूनही सूचक विधान केलं आहे.

अजोबा, नातवाची जोडी असताना ऑडिट कसं होणार?

साखर कारखान्यांच्या ऑडिटबाबत बोलताना ते म्हणाले,  कोल्हापूर मधल्या केवळ 12 कारखान्यांचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ऑडिट झालं आहे. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दल आमचा आक्षेप आहे, हे ऑडिट कस करणार? आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष आहेत, आणि नातू साखर कारखान्याचा अध्यक्ष असेल तर ऑडिट कस होणार? अशी टीका शेट्टी यांनी शरद पवार, रोहित पवार यांचे नाव न घेता केली आहे. तर तुकड्या तुकड्यात एफआरपी मिळत आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही शेट्टी म्हणाले आहेत.

ऊसतोड मजुरांना संरक्षण द्या

तसेच बंद पडलेले कारखाने सुरू केले तर पुढच्या वर्षी साखर गाळप प्रश्न भेडसावनार नाही. पुढच्या वर्षी एक रक्कमी एफआरपी घेण्यावर आम्ही ठाम आहोत. ऊस तोडणी महामंडळ यांनी मजुरांची नोंदणी करावी. त्यांना टनामागे 10 रुपये दिली जात आहेत. तसेच मजुरांची सुरक्षा महत्वाची आहे ती त्यांना द्यावी. असेही शेट्टी म्हणाले आहेत. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी तोफ डागली आहे.  सध्या माझ्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे राजकारणात घोडेबाजार आणि इतर विषयावर बोलायला वेळ नाही, सदाभाऊ आमच्याकडे होते तेव्हा शेतकरी नेते होते, आता ते काय आहेत हे मी ऐकून नाही, असा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा राजू शेट्टी आणि सादाभाऊ खोत वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.

Follow Us
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!