Sugarcane Sludge : अखेर 7 महिन्यानंतर ऊस गाळप हंगाम समाप्त, काय राहिली हंगामाची वैशिष्ट्ये?

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा अचानक वाढलेले ऊसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्याचे बिघडलेले नियोजन यामुळेच झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात कधी नव्हे ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कारखाना प्रशासनाला त्याचे नियोजन न जमल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यातच अधिकचा होता.

Sugarcane Sludge : अखेर 7 महिन्यानंतर ऊस गाळप हंगाम समाप्त, काय राहिली हंगामाची वैशिष्ट्ये?
साखर कारखाना
राजेंद्र खराडे

|

Jun 15, 2022 | 1:10 PM

पुणे : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम वेगवगळ्या अंगाने चर्चेत राहिलेला आहे. प्रथमच ऊसाचे गाळप हे सलग 7 महिने सुरु राहिले असून (Sugar production) साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला देखील मागे टाकले आहे. यंदाच्या हंगामात राज्यातील 200 पैकी 198 (Sugar Factory) साखर कारखान्याची धुराडी ही बंद झाली आहे. हंगामात विक्रमी ऊसाचे गाळप झाले असले तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम राहिला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी 1 हजार 320 लाख टन ऊसाचे गाळप केल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. तर यामधून 137 लाख 27 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सहकार उद्योगाला चालना देणारा यंदाचा हंगाम राहिला असून ऊसच सर्वात मोठे नगदी पीक असल्याचे सिध्द झाले आहे. राज्यात केवळ 2 साखर कारखाने सध्या सुरु आहेत.

उर्वरित उसासाठी 2 साखर कारखाने

ऊसाच्या गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात पश्चिम महाराष्ट्राने बाजी मारली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून केलेले नियोजन आणि गाळप याचा ताळमेळ लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान तर टळलेच आहे पण या विभागातील साखर कारखान्यांनी मराठवाड्यील गाळप व्हावे यासाठी भूमिका घेतली होती. आता हंगाम संपल्यात जमा असला तरी उर्वरित शिल्लक उसासाठी ता.भोर येथील अनंतनगरातील राजगड सहकारी साखर कारखाना, मुक्ताईनगरातील संत मुक्ताईनगर शुगर्स आणि औरंगाबाद विभागातील एक साखर कारखाना सुरु आहे. शिवाय उर्वरित सर्व ऊसाचे गाळप होईपर्यंत हे कारखाने सुरु राहणार आहेत.

अधकिचे गाळप करुनही ऊस शिल्लक

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा अचानक वाढलेले ऊसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्याचे बिघडलेले नियोजन यामुळेच झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात कधी नव्हे ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कारखाना प्रशासनाला त्याचे नियोजन न जमल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यातच अधिकचा होता. गाळपाविना ऊस शिल्लक नसल्याचे सांगितले जात असले तरी मराठवाड्यात 1 कारखाना हा सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

विक्रमी गाळप अन् साखरेचे उत्पादनही

राज्यातील 200 साखर कारखान्यांची धुराडी जवळपास गेल्या 7 महिन्यापासून सुरु होती. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उताराही चांगला मिळाला होता. त्यामुळेच राज्यात 1320 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. गाळपाबरोबर साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ करुन जागतिक पातळीवर राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 137.27 लाख टन साखरेचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून झाले असून यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आणि सहकारसाठी योग्य दिशा देणारे राहणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें