
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. पण त्याच्यावरून पुण्यात महाभारत घडलं आहे. घायवळ याला काहींनी रसद पुरवली. त्याला मदत केली. या मदत करणाऱ्यांचे तार भाजपपर्यंत असल्याचा दावा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ते गेल्या दोन दिवसांपासून मंत्री आणि भाजपतील ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर निशाणा साधत आहेत. आताही समीर पाटील या मध्यस्थाचे नाव घेत त्यांनी दादांवर निशाणा साधला आहे.
फडणवीसांनी गुन्हेगारांवर वचक दाखवावा
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना चांगला धडा शिकवावा. पुण्याला गुन्हेगारीचा डाग लागणार असले तर हा डाग पुसून काढला पाहिजे. जर ग्रह खात्याने ठरवलं तर आज पासून 15 दिवसात निलेश घायवळ टोळी महाराष्ट्रत दिसणार नाही, असे धंगेकर म्हणाले. पुणे पोलिसांनी जसा आंदेकर टोळीचा तपास केला तो शेवटच्या टोकापर्यंत केला,त्याच प्रमाणे देखील ह्याचा तपास झाला पाहिजे. पोलीस खात्यातून दबका आवाज आहे हा माणूस आम्हाला त्रास देतो, असा आरोप त्यांनी केला आहे.
समीर पाटील आहे तरी कोण?
कोथरूडमधील गुन्हेगारी,निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदांमध्ये छेडछाड करणाऱ्याच्या विरोधात पोलिसाकडे कारवाईची मागणी केली. हे सगळं कोण करत तर समीर पाटील नावाचा व्यक्ती करतो, तर हा समीर पाटील कोण तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे. दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा, पोलिसांना त्रास देणारा असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. पोलिसांनी या समीर पाटीलची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. पुणे पोलिसांनी जसा आंदेकर टोळीचा तपास केला तो शेवटच्या टोकापर्यंत केला,त्याच प्रमाणे देखील ह्याचा तपास झाला पाहिजे, अशी विचारणा त्यांनी केला.
समीर पाटीलची इतकी कमाई कशी?
समीर पाटीलवर 20 वर्षाच्या आधी गुन्हा दाखल आहेत. ,समीर पाटीलकडे 100 कोटींची मालमत्ता आहे, ती त्याला हुंड्यात मिळाली का राजकीय हुंड्यात मिळाली. याचा व्यवसाय, कुठं भागीदार आहे का, मग त्याने 100 कोटी कसे कमावले. हा तर दादाचा माणूस, माझा काही संबंध नाही, माझ्यापेक्षा जास्त माहिती पोलीस घेतली ,तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना 100 लोकांतून गुन्हेगारी स्टाईल न बोलता उठवणारा हा समीर पाटील आहे. हा माणूस त्रास देतो अशी पोलीस दलातून ओरड असल्याचे धंगेकर म्हणाले.