AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Update : राज्यात प्रथमच पावसासाठी रेड अलर्ट, कोणत्या शहरांमध्ये कोसळणार अति मुसळधार

weather update and rain : राज्यात प्रथमच सर्वत्र मान्सून सक्रीय झाला आहे. मंगळवारी राज्यभरात पाऊस होत आहे. हवामान विभागाने हा पाऊस अजून काही दिवस सक्रीय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

IMD Update : राज्यात प्रथमच पावसासाठी रेड अलर्ट, कोणत्या शहरांमध्ये कोसळणार अति मुसळधार
| Updated on: Jul 18, 2023 | 2:51 PM
Share

पुणे | 18 जुलै 2023 : जुलै महिन्यातील पंधरा दिवस पावसाच्या प्रतिक्षेत गेली. आता उर्वरित कार्यकाळात चांगला पाऊस होईल, अशी स्पष्ट चिन्ह हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अरबी समुद्रात झालेल्या बदलांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना प्रथमच रेड अलर्ट दिले आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिले आहे. यामुळे राज्यातील काही भागांना अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे.

कुठे कोणता अलर्ट

पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी १८ रोजी रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत १९ रोजी रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पाच दिवस राज्यात चांगलाच पाऊस होणार आहे.

मध्य भारतात पाऊस

पुढील 2 दिवसांमध्ये भारताच्या काही भागांत जोरदार पाऊस होणार आहे. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे नाशिकचा घाट क्षेत्र आणि किनारी आंध्रचा काही भागात आणि मराठवाड्यातील काही भागांत तुरळक अन् मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पाऊस सुरु आहे. ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

विदर्भात जोरदार

विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. विदर्भात पाऊस सुरु असल्यामुळे धरणसाठा चांगला वाढणार आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गडचिरोली नगरपरिषदच पाण्याखाली आली आहे. जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे सखल भाग जलमय झाला आहे.

राज्यात पावसाने जोर पकडला आहे. यामुळे आता धरणसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना झाल्यानंतर राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यामुळे शहरांमध्ये पाणी कपात करण्यासंदर्भात चर्चा होऊ लागली होती.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.