AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली ठोंबरे यांच्या सोशल मिडियावरील फोटोनंतर पुणे पोटनिवडणुकीत ट्विस्ट

रुपाली पाटील यांनी मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो टाकला. त्यावरुन विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदान गुप्त असताना रुपाली पाटील यांनी ते उघड केल्याचा आरोप केला आहे.

रुपाली ठोंबरे यांच्या सोशल मिडियावरील फोटोनंतर पुणे पोटनिवडणुकीत ट्विस्ट
Image Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 26, 2023 | 1:02 PM
Share

पुणे :  पुणे कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil-Thombare) एका वादात आडकल्या आहेत. त्यांनी एक फोटो फेसबुक पेजवर टाकला आहे. त्या फोटोनंतर विरोधकांनी त्यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. परंतु हा आपला फोटो नाही, तो फोटो मला एक मतदाराने पाठवला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या वादामुळे आपण संध्याकाळी पाच वाजता मतदान करणार आहे, तोपर्यंत यंत्रणांनी शोध घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

काय आहे पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शुभ सकाळ. कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा… असा उल्लेख त्यात आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सोबत रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम (EVM) मशीनचा फोटो अपलोड केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रुपाली पाटील यांनी फेसबुकवर टाकलेला फोटो

काय म्हणतात विरोधक

रुपाली पाटील यांनी मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो टाकला. त्यावरुन विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदान गुप्त असताना रुपाली पाटील यांनी ते उघड केल्याचा आरोप केला आहे. त्यांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय म्हणतात रुपाली पाटील

सोशल मिडियावरील फोटोच्या वादावर रुपाली पाटील यांनी आपली भूमिका टीव्ही ९ मराठीशी बोलताना मांडली. हा फोटो एका मतदाराने आपणास पाठवला. तो मी पेजवर टाकला. हा फोटो माझा नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मी अजून मतदानच केले नाही तर माझा फोटो कसा येणार? मी संध्याकाळी पाच वाजता मतदान करणार आहे. तोपर्यंत यंत्रणेने शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटलेय.

मतदानाला अल्प प्रतिसाद

कसब्यात अत्यंत धीम्यागतीने मतदान सुरू आहे. कसब्यात सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अवघे 6.5 टक्के मतदान झालं आहे. मतदार दुपारपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर, हिंदू महासंघाचे आनंद दवेही मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपला ही सीट राखण्याची आशा वाटत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?