Sachin Kharat : मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे, शिमग्याच्या आधी शरद पवार यांच्यावर बोंबलायला सुरू करू नका, खरातांची पडळकरांवर टीका

काही मालक दोन तऱ्हेचे प्राणी पाळतात एक चावायला आणि दुसरा फक्त जोरजोरात ओरडायला. त्यामुळे तुम्हाला फक्त जोरात ओरडण्यासच ठेवले आहे, अशी टीका सचिन खरात यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे.

Sachin Kharat : मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे, शिमग्याच्या आधी शरद पवार यांच्यावर बोंबलायला सुरू करू नका, खरातांची पडळकरांवर टीका
गोपीचंद पडळकरांवर टीका करताना सचिन खरातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 1:49 PM

पुणे : मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे गोपीचंद पडळकर. शिमग्याच्या अगोदरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल बोंबलायला सुरुवात करू नका, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. पवार कुटुंबीयांच्या रेशन कार्डाची चौकशी करावी, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला होता. त्याला रिपाइं खरात गटाने टीका केली आहे. सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका करताना म्हटले, की गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून तुम्ही दु:खी आहात, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु काही मालक दोन तऱ्हेचे प्राणी पाळतात एक चावायला आणि दुसरा फक्त जोरजोरात ओरडायला. त्यामुळे तुम्हाला फक्त जोरात ओरडण्यासच ठेवले आहे, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे.

‘तुम्ही किती अध्यात्मिक काम केले?’

मंत्रिमंडळात तुमचा समावेश झाला नाही, म्हणून पवार साहेब यांच्यावर ओरडू लागला आहात. पवार घराण्याच्या रेशन कार्डच्या चौकशीची मागणी करत आहात. परंतु तुम्ही आटपाडीमध्ये किती अध्यात्मिक काम केले आहे, याची नोंद तुमच्या रेशन कार्डावर झाली असेल, ते जनतेपुढे मांडा. त्यामुळे पडळकर मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे. शिमग्याच्या अगोदर शरद पवार यांच्याबद्दल बोंबलायला सुरुवात करू नका, असा हल्लाबोल सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते पडळकर?

संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावर असलेल्या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यावर जेवढी नावे आहेत, त्यांची सखोल चौकशी व्हावी. सखोल चौकशीनंतर पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर उघड होईल, असे पडळकर म्हणाले होते. पवार कुटुंब हे संविधानापेक्षा मोठे नाही. आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनी त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी नुकतीच केली होती. शरद पवारांना लोक किंमत देत नाहीत, त्यांच्यामागे कोणताही जनाधार नाही, अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली होती. दरम्यान, राष्ट्रवादीने मात्र याची दखलही घेतली नव्हती.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.