VIDEO: महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती; सतेज पाटलाचां घणाघात

| Updated on: Apr 25, 2021 | 1:19 PM

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. (satej patil slams mahadevrao mahadik over Kolhapur Gokul Doodh Sangh Election)

VIDEO: महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती; सतेज पाटलाचां घणाघात
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
Follow us on

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती आहे, असा घणाघाती हल्ला सतेज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाडिक गटानेही पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (satej patil slams mahadevrao mahadik over Kolhapur Gokul Doodh Sangh Election)

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे. तर, विनाकारण खालच्या पातळीवर टीका करू नका. महाडिक अजून सहीसलामत आहेत. चक्रव्युहाच्या बाहेर जायच आहे की नाही हे महाडिक ठरवणार आहे, त्यामुळे टीका करताना सांभाळून बोला, असा पलटवार महादेवराव महाडिक यांनी केला आहे. त्यावर आता पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वर्चस्वासाठी आरोप-प्रत्यारोप

येत्या 2 मे रोजी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे गोकुळवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाटील आणि महाडिक गटात प्रचंड चुरस निर्माण झाली असून त्यातूनच या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 2 मे पर्यंत हे आरोप-प्रत्यारोप होणार असल्याने कोल्हापूरचं राजकारण मात्र चांगलच तापणार आहे.

पाटलांचा दणका

सत्ताधारी आघाडीला दणका देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेक संचालकांना विरोधी आघाडीत सहभागी करुन घेतलं आहे. सतेज पाटील यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार संजय मंडलिक हे एकवटले आहेत. त्यांनी सोमवारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. ही आघाडीच सत्तेवर येणार असा दावाही सजेत पाटलांनी केला आहे. गोकुळ दूध संघावर संध्या माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. महाडिक हे भाजप तर पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत मातब्बर चेहरे निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यातच सत्ताधारी गटाचे 6 संचालक विरोधी आघाडीकडे गेले आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही पॅनलचे उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलकडून उमेदवारांची घोषणा अर्ज माघारीच्या दिवशीच होण्याची शक्यता आहे. (satej patil slams mahadevrao mahadik over Kolhapur Gokul Doodh Sangh Election)

 

संबंधित बातम्या:

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांना बांधून ठेवलंय!

(satej patil slams mahadevrao mahadik over Kolhapur Gokul Doodh Sangh Election)