कोरोनानं पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची 100 टक्के फी माफ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Mवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. तर, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत त्यांची 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी फी कपातीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला आहे.

कोरोनानं पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची 100 टक्के फी माफ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 11:39 AM

पुणे: कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अनेकांनी रोजगार गमावला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींना गमावलं आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. तर, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत त्यांची 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी फी कपातीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

संपूर्ण फी माफ

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांना फी कपातीसंदर्भात आवाहन केलं होतं. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची आई किंवा वडील या दोघांपैकी आणि दोन्ही पालक गमावले आहेत त्यांना 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फी कपातीचा निर्णय

सावित्रीबीई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं यंदाच्य शैक्षणिक वर्षासाठी फी कपातीचा निर्णय घेतला आहे. ग्रंथालय फी, प्रयोगशाळा फी, जिमखाना फी, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटी, कॉम्प्युटर फॅसिलिटी फीमध्ये 50 टक्के कपात करण्यात आलीय. तर, विद्यार्थी कल्याण फीमध्ये 75 टक्के कपात करण्यात आलीय. परीक्षा फी, विकास निधीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आलीय. तर, औद्योगिक भेट, महाविद्यालय वार्षिक नियतकालिक फी, प्रयोगशाळा अनामत, सी. एम. डिपॉझिट, इतर फी, आरोग्य तपासणी फी, आपत्ती व्यवस्थापन फी आणि अश्वमेध फीमध्ये 100 टक्के कपात करण्यात आलीय.

फक्त या वर्षासाठी फी सवलत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी सवलत देण्याचा घेतलेला निर्णय फक्त 2020-21 या वर्षासाठी लागू असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना देखील हा निर्णय लागू असणार आहे. हॉस्टेलची फी ज्यावेळी विद्यार्थी महाविद्यालयात येतील त्यावेशी महाविद्यालयांनी फी आकारावी, असं सांगण्यात आलंय.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक गमावले आहेत, त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्वाचा घेतल्यानं दिलासा मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाकडून फी कपात

कोरोना विषाणू संसर्गामुळं विद्यार्थ्यांना दिल्सा देण्यासाठी यापूर्वी मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून देखील फी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

इतर बातम्या:

Pune Weather | पुण्यात दोन दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, पुढचे तीन दिवस आकाश ढगाळ राहणार

PGCIL Recruitment 2021: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी, 1 लाखांपर्यंत पगार मिळणार

Savitribai Phule Pune University decided fee waiver for those students who lost their parents due to corona