Pune Weather | पुण्यात दोन दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, पुढचे तीन दिवस आकाश ढगाळ राहणार

कालपासून पुण्यात वातावरण सामान्यतः ढगाळ स्वरूपाचं आहे. पुढचे तीन दिवस पुणे शहर आणि परिसरात असंच ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर पुढचे दोन दिवस पुणे आणि परिसरात हलक्या सरी पडतील अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.

Pune Weather | पुण्यात दोन दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, पुढचे तीन दिवस आकाश ढगाळ राहणार
प्रातिनिधीक फोटो

पुणे : कालपासून पुण्यात वातावरण सामान्यतः ढगाळ स्वरूपाचं आहे. पुढचे तीन दिवस पुणे शहर आणि परिसरात असंच ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर पुढचे दोन दिवस पुणे आणि परिसरात हलक्या सरी पडतील अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. पुण्यात १ जूनपासून आतापर्यंत 373.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरीपेक्षा 30.2 मिमी पाऊस यंदा कमी पडल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे. (The weather will be cloudy in Pune for the next three days with light showers)

पुढचे तीन दिवस आकाश ढगाळ, हलक्या सरी कोसळणार

पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडला आहे. शहरात मात्र, पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. बुधवारी शहरात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 2.6 मिमी पाऊस पडला. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होतं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 0.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. पुणे शहर आणि परिसरात पुढचे दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. येत्या शनिवारपासून पुढचे तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

येत्या 2-3 दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. त्यानुसार पुणे आणि परिसरातही पुढच्या काही दिवसांत पावसातचा इशारा वेधशाळेने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा सध्या ओडिशाजवळ आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, पश्चिम किनारपट्टीहून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Weather | पुण्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान घरसलं, उद्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता

पत्नीला सिगरेटचे चटके, अघोरी प्रयोगाने छळ, अखेर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

खंडणीचा हप्ता देण्यास नकार, चाकणमध्ये कोयत्याने वार करत तरुणाचे सोन्याचे दागिने लुटले

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI