खंडणीचा हप्ता देण्यास नकार, चाकणमध्ये कोयत्याने वार करत तरुणाचे सोन्याचे दागिने लुटले

भांबोली गावामध्ये अक्षय कोळेकर यांचे पानांचे दुकान आहे. दुकान सुरु ठेवण्यासाठी आरोपीकडून महिन्याला एक हजार रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती.

खंडणीचा हप्ता देण्यास नकार, चाकणमध्ये कोयत्याने वार करत तरुणाचे सोन्याचे दागिने लुटले

पिंपरी चिंचवड : खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करत सोन्याचे दागिने लुटण्यात आले. पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील भांबोली परिसरात ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी 6 खंडणीखोरांना महाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी ज्या भागात गुन्हा केला, त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढत दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

खंडणीखोरांनी केलेल्या कोयता हल्ल्यात अक्षय कोळेकर हा तरुण जखमी झाला आहे. भांबोली गावामध्ये अक्षय कोळेकर यांचे पानांचे दुकान आहे. दुकान सुरु ठेवण्यासाठी आरोपीकडून महिन्याला एक हजार रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र अक्षय कोळेकर यांनी आरोपींना हा हप्ता देण्यास नकार दिला.

खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा

चिडलेल्या सहा जणांनी अक्षय आणि त्यांच्या तीन मित्रांना मारहाण करत जखमी केले. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन जबरदस्तीने तोडून घेऊन गेले. या प्रकरणी आरोपींवर खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

सहा आरोपींची धिंड

आकाश शेळके, गणेश डांगले, नारायण घावटे, गणेश लिंभोरे, विठ्ठल पिकळे, साईनाथ राऊत अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. दरम्यान, या आरोपींनी ज्या भागात गुन्हा केला, त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढत दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

आरोपींची धिंड काढण्याचा आधीही प्रकार

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची धिंड काढल्याचा आरोप याआधीही झाला होता. तसेच पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांचीही पोलिसांनी धिंड काढल्याचं यापूर्वी समोर आलं होतं.

संबंधित बातम्या :

VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?

VIDEO | पिंपरीत कोयता उगारुन गावगुंडांची नागरिकांना मारहाण, त्याच रस्त्यावर पोलिसांकडून आरोपींची धिंड?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI