पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

सीरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यात लहान मुलांवरील कोव्होवॅक्सची क्लिनीकल चाचणी सुरु करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. ही लस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटवर प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, नोव्हाव्हॅक्सच्या लसीची सीरमकडून ट्रायल
Novavax (Photo : Reuters)
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 8:07 AM

पुणे : पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (The Serum Institute of India (SII) आता लहान मुलांसाठी कोव्हिड लसीची चाचणी घेणार आहे. नोव्हाव्हॅक्सच्या (Novavax) कोव्होवॅक्स (Covovax) या कोरोना लसीच्या क्लिनीकल चाचणीसाठी सीरमला परवानगी मिळाली आहे. देशात लहान मुलांवर केली जाणारी ही चौथी चाचणी ठरणार आहे. (Serum Institute to begin Novavax Covid vaccine Covovax clinical trials for children)

जुलै महिन्यात चाचणी होणार

सीरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यात लहान मुलांवरील कोव्होवॅक्सची क्लिनीकल चाचणी सुरु करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अमेरीकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने कोव्होवॅक्स ही कोव्हिडवरील लस तयार केली आहे. सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांवरील वयोगटासाठीही कोव्होवॅक्स लस बाजारात आणण्याची तयारी सीरम करत आहे.

वेगवेगळ्या व्हेरीएंटवर प्रभावी असल्याचा दावा

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नोव्हाव्हॅक्सने सीरम इन्स्टिट्यूटसोबत NVX-CoV2373 या कोरोना लसीसाठी उत्पादन करार करण्याची घोषणा केली होती. ही लस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटवर प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. सिम्प्टमॅटिक कोव्हिड रोखण्यात 90 टक्के, तर मध्यम स्वरुपाची लक्षणे रोखण्यात ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला होता.

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरवरुन नोव्हाव्हॅक्ससोबत भागीदारीविषयीची माहिती मार्च महिन्यात दिली होती.

याआधी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला लहान मुलांवर क्लिनीकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. नागपुरात लहान मुलांवर या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

(Serum Institute to begin Novavax Covid vaccine Covovax clinical trials for children)