Pune Sharad Pawar : अमृता फडणवीस यांचं नाव न घेता शरद पवारांचा निशाणा, मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून फटकारलं

| Updated on: Apr 25, 2022 | 1:10 PM

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर टीका करणे शोभत नाही, असे ते म्हणाले.

Pune Sharad Pawar : अमृता फडणवीस यांचं नाव न घेता शरद पवारांचा निशाणा, मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून फटकारलं
शरद पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : मुख्यमंत्र्यांवर (CM) धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण त्यांचे एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर टीका करणे शोभत नाही. मुख्यमंत्री हे नाव नाही, एक संस्था आहे, त्यावर अशी टीका करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. ते पुण्यात बोलत होते. ते म्हणाले, की कुणाला एखादा धार्मिक (Religious) कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करू शकता, पण तो कार्यक्रम माझ्या दारात येऊन करतो म्हटले तर माझ्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता झाली, तर त्याला दोष देता येणार नाही. बघू हे वातावरण आता किती खाली जाईल, असा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत काही प्रश्न विचारले होते. त्यात महाविकास आघाडी, कायदा सुव्यवस्था यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. यावेळी ट्विटच्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकेरी केला. यावरून आता अमृता फडणवीस यांच्यावरही टीका होत आहे.

‘पुन्हा येईन म्हणणारे येवू शकले नाहीत’

शरद पवार यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पुन्हा येईन म्हणणारे येवू शकले नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत, असा टोला त्यांनी लगावला. हनुमान चालिसाचा मुद्दा, वीजप्रश्न, राज्यातली कायदा-सुव्यवस्था यावरही पवार यांनी आपले मत मांडले. सत्ता गेल्यानंतर कसे वागावे, याविषयीही त्यांनी भाजपाला सल्ला दिला.

आणखी वाचा :

Madhav Godbole passed away : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; पुण्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

NCP : पंतप्रधानांच्या घरासमोर सर्व धर्मांच्या प्रार्थना पठणाची परवानगी द्या; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची गृहमंत्री शाह यांच्याकडे मागणी