AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शरद पवार आले तर त्यांना वाकून नमस्कार करेन… राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackeray | शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 6-7 जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आयोजीत करण्यात आले होते. मोरया गोसावी क्रीडा संकुलावर नाट्य संमेलनात मनसे नेते राज ठाकरे यांची मुलाखत फारच रंगली. त्यांच्या सडेतोड उत्तरं दिलीच पण कानमंत्रही दिला. नाट्य संमेलनाला दिशा देण्याचे काम त्यामुळे होणार आहे.

आता शरद पवार आले तर त्यांना वाकून नमस्कार करेन... राज ठाकरे असं का म्हणाले?
| Updated on: Jan 07, 2024 | 4:51 PM
Share

पिंपरी, पुणे | 7 जानेवारी 2024 : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रविवारी, मनसे नेते राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत गाजली. राज ठाकरे यांनी मिश्किल संवाद साधतांनाच खास ठाकरी शैलीत नाट्यक्षेत्रातील उणीवांवर बोटही ठेवले. त्यांचे सुक्ष्म निरीक्षण यावेळी दिसून आले. नाट्य क्षेत्रातील घडामोडी आणि बारकावे टिपतानाच त्यांनी कलाकारांचे कानही पिळले. त्यांनी मोलाचे सल्ले दिले. नाट्यक्षेत्रासह सध्याच्या राजकीय घडामोडी, जातीपातीचे राजकारण यावर पण राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली. महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत असल्याचे झणझणीत अंजन त्यांनी सर्वांच्याच डोळ्यात घातले.

मान देणार केव्हा?

राज ठाकरे यांनी नाट्यक्षेत्र, चित्रपट सृष्टीतील मराठी कलाकार एकमेकांना टोपणनावाने, शॉर्टकट नावाने हाक मारतात, यावर कान टोचले. जोपर्यंत कलाकार एकमेकांना मान देणार नाही, त्यांना वेगळी ओळख, आदर मिळणार नाही, हे त्यांनी पटवून दिले. अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांना मी सरच म्हणत होतो. ही सर म्हणण्यासारखीच माणसं होती. यांना सर नाही म्हटलं तर काय म्हणायचं पब्लिकली मामा आलेत का. सख्खे मामा लागतात का तुझे. इतका मोठा कलावंत आहे ना, मग म्हणणा अशोक सर, असे ते म्हणाले.

कशासाठी ही आपुलकी

एकमेकांना चारचौघात आपुलकी दाखवून टोपणनावाने हाका मारणे बंद करा, हे राज ठाकरे यांनी बजावले. कशासाठी ही आपुलकी. ही आपुलकी तुमच्या घरात ठेवा. लोकांसमोर याल तर एकमेकांना मान द्या. तरच या सिनेमासृष्टीला अर्थ आहे. साऊथमधील नवे लोक पाहा कसे नम्र बसतात. आपल्याकडे कुणीही येतं आणि खांद्यावर हात ठेवतात. यावर त्यांनी बोट ठेवले.

शरद पवार आले तर…

त्यांनी राजकीय दृष्ट्या एक उदाहरण सांगितले. समजा आता इथे शरद पवार साहेब आले तर त्यांना मी वाकून नमस्कार करेन. माझ्या महाराष्ट्रातील एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावर राजकीय काय बोलायचं हा विषय वेगळा आहे. मला वाटतं तुम्ही उलटं करतात. हातजोडून विनंती आहे. तुम्ही एकमेकांना मान द्या. संपूर्ण नाव द्या. तुम्ही त्यांना सर म्हणा. अरुण सरनाईक यांना कुणी आरू बिरू हाक मारलेली. मला नाही आठवत श्रीराम लागूंना शिरूबिरू हाक मारलेली मला नाही आठवत. लागू साहेब आलेत, लागू सर आलेत, त्या लोकांनीही त्यांचा आब राखला होता, हे त्यांनी ठासून सांगितले.

वोह, अच्छा लडका है

राज ठाकरे यांनी कलाकारांना एकमेकांना आदर देण्याविषयी मत मांडले. त्यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. ‘हिंदी चित्रपटसृष्टी आपल्याकडे आहे. एक उदाहरण सांगतो. एका दिग्दर्शकाला मध्यंतरी भेटलो. एका मराठी कलावंताबद्दल बोललो. तो बोलला कोण आहे हा. मी कधी नाव ऐकलं नाही. चारपाच हिंदी सिनेमात त्याने काम केलेलं होतं. तरीही ओळखत नव्हता. मी त्याचं ऊर्फ नाव सांगितलं. त्यावर दिग्दर्शक म्हणाला, अरे वोह… अच्छा लडका है, अच्छा लडका है…म्हणजे? तिथपर्यंत असल्या नावांची ख्याती पोहोचली तुमची. तिच गोष्ट मी हिंदीतील लोकांना मी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डंबद्दल बोलतो तेव्हा ते आदरानेच सांगतात. अरे अशोक सर काय काम करता है आदमी…असंच म्हणतात. मला वाटतं आज सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, अशा नावाने हाक मारणार नाही. एकमेकांना मान देऊ आणि मान घेऊ.’

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.