Sanjay Raut: तर मी GenZ ना पद्मश्री देईन…संजय राऊत यांच्या विधानाची चर्चा, पुण्यात नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut Speech: पुण्यात मागील काही दिवसांपासून MPSC परीक्षा फुटी प्रकरणातसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनातील विद्यार्थ्यांंना पाठिंबा दर्शवण्यासाठी खासदार संजय राऊत काल पुण्यात गेले होते.

Sanjay Raut Pune: पुण्यात मागील काही दिवसांपासून MPSC परीक्षा फुटी प्रकरणातसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनातील विद्यार्थ्यांंना पाठिंबा दर्शवण्यासाठी खासदार संजय राऊत काल पुण्यात गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांनी भाषणही केले ज्यात एक विधानाची जोरदार चर्चा होत आहे. तर या भाषणात संजय राऊत नेमके काय म्हणाले ते पाहा…
शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, “तरुणांनी बोलू नये, शिक्षित होऊ नये, आपल्या हक्कांबद्दल आवाज उठवू नये असे सत्ताधाऱ्यांना वाटते. पण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. अन्यायाविरोधात वेळोवेळी पेटून उठणे ही ही या मातीची शिकवण आहे. मागील काही दिवसांपासून तुम्ही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनामाची मागणी करत आहात. रोहित पवार यांनी उद्याची पिढी वाचावी, यासाठी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून तुम्हा तरूणांसोबत आंदोलनाला बसले आहेत. पुण्याच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांच्या मनात आता धडकी भरली आहे. मागे हटू नका, तुमच्या एकीमुळे आयोगाचा अध्यक्ष नक्कीच हटवला जाईल.”
MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणे, रखडलेल्या नोकरभरत्या आणि आयोगाच्या कारभारातील अनागोंदी कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचे एस एम जोशी पुलावर आंदोलन सुरूये. या आंदोलनातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी संजय राऊत यांनी रविवारी संध्याकाळी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरजोरात घोषणा देऊन राऊतांचे स्वागत केले.
तुमच्या आवाजाने खरंतर सरकार घाबरले आहे. परंतु त्यांनी बहिरे असल्याचे सोंग घेतले आहे. पुण्यातील आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातील जंतरमतर. आणि तुम्हाला माहित आहे की जंतर-मंतरचा पॅटर्न असा आहे की ‘घेतल्याशिवाय राहत नाही’. धर्मेंद्र प्रधान गेले. आता पुढचा नंबर एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचा आहे. हे सरकार जर तरुणांचं ऐकणार नसेल तर त्यांना नेमकं कोणाचं ऐकायचंय? राज्यात आणि देशात बदलून घडवून आणण्याची ताकद फक्त आता तरुणांमध्ये आहे. सरकार सतत तुमच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत. सरकार जर मनाने पवित्र असते तर असं केले नसते. तरुणांच्या मागण्या समजून घेतल्या असत्या. एमपीएससी आयोगाचे शुद्धीकरण साधी मागणी मुलांची आहे पण जे सरकार शुद्ध पद्धतीने निवडणुकाच घेऊ शकत नाही ते परीक्षा काय घेणार? मुलांनो तुमचा आत्मविश्वास असाच कायम ठेवा, म्हणजे कुठलाही चुकीचा माणूस वरच्या पदावर बसवण्याआधी सरकार हजारवेळा विचार करेल, जंतर मंतरवर आंदोलक मुलांच्या घोषणांनी मला खरोखर भुरळ पडली आहे. मी जर देशाचा प्रधानमंत्री झालोच तर घोषणा लिहिणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन टाकेन. असं राऊत म्हणाले.