Bandu Andekar: 67 लाखांचे दागिने, अडीच लाख रोकड; बंडू आंदेकरच्या घरात काय काय सापडलं? ऐकून बसेल धक्का

Raid on Bandu Andekar house : आयुष कोमकर प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या छाप्यात त्यांना 67 लाखांचे दागिने, दीड लाख रोकड आणि इतर जमिनीचे कागदपत्र मिळाले. आता बंडू आंदेकरची संपत्ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

Bandu Andekar: 67 लाखांचे दागिने, अडीच लाख रोकड; बंडू आंदेकरच्या घरात काय काय सापडलं? ऐकून बसेल धक्का
Bandu Andekar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 12, 2025 | 1:23 PM

पुण्यातील आयुष कोमकर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या घरावर गुन्हे शाखेने रेड टाकली आहे. तसेच अमन पठाण, यश पाटील, आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर, तिची मुले स्वराज आणि तुषार यांच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली आहे. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती बरेच काही लागले असल्याचे समोर आले आहे.

बंडू आंदेकरच्या घरातून काय मिळाले?

आयुष कोमकर प्रकरणानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज हाती लागला आहे. पोलिसांनी तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्याही पोलिसांना मिळाल्या आहेत.

वाचा: मुंबई हादरली! जेवणाच्या वादाचा हादरवणारा शेवट, 5 मित्रांनी असा कांड रचला की त्याला आयुष्यातून उठवलं

आंदेकरच्या मुलीच्या घरून काय जप्त केले?

आयुष कोमकर प्रकरणाचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनखाली तपास सुरु आहे. आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर, तिची मुले स्वराज आणि तुषार यांच्या घरातून जळपास 16 मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच 21 हजारांची रोख रक्कम, दागिने खरेदी केल्याच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याविरोधात लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आंदेकरच्या घराभोवती जवळपास 25हून अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच कोमकर प्रकरणातील पाच आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.