AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro: स्वप्नात विचार केला नव्हता शिवाजीनगर ते स्वारगेट दहा मिनिटांत गाठणार, स्वारगेट ते पिंपरी आता सुसाट प्रवास

Pune Metro News: पुणे मेट्रोचे काम महामेट्रोने केले. महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग होते. आता त्यांची कामे पूर्ण झाली आहे. या मार्गावरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीत कुठलीही अडचण येणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune Metro: स्वप्नात विचार केला नव्हता शिवाजीनगर ते स्वारगेट दहा मिनिटांत गाठणार, स्वारगेट ते पिंपरी आता सुसाट प्रवास
पुणे मेट्रो स्थानक
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 01, 2024 | 7:10 AM
Share

पुणे मेट्रोतील सर्वात महत्वाचा टप्पा रविवारी सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने पुणे मेट्रोच्या या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर दुपारी चार वाजेपासून पुणेकरांचा शिवाजीनगर ते स्वारगेट प्रवास मेट्रोने सुरु झाला. मेट्रोच्या या प्रवासाचा सुखद अनुभव पहिल्याच दिवशी अनेक पुणेकरांनी घेतला. भव्य दिव्य अंडरग्राऊंड मेट्रो स्थानक, फुलांनी सजवलेले स्थानके, प्रवाशांचे होणारे स्वागत आणि सर्वात महत्वाचे पुण्यातील वाहतूक कोंडीत स्वारगेट ते शिवाजी नगर पोहचण्यास लागलेला दहा मिनिटांचा वेळ…पुणे मेट्रोतील शिवाजीनगर ते स्वारगेट मार्ग सुरु झाल्यामुळे दहा मिनिटांत हा प्रवास होत आहे. आम्ही स्वारगेटवरुन शिवाजीनगरात दहा मिनिटांत पोहचू, असा स्वप्नातही विचार केला नव्हता, असे एका पुणेकराने सांगितले. स्वारगेट ते शिवाजीनगर रस्ते वाहतुकीने ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो.

सेल्फी काढले अन् स्टेशन आले…

पुणे मेट्रोचा स्वारगेट प्रवास अंडरग्राऊंड आहे. या मेट्रोत बसल्यानंतर अनेकांनी फोटो, व्हिडिओ घेतले. मंडईतून बसलेला पुणेकर म्हणला, सेल्फीसाठी मोबाईल काढला. फोटो घेण्यास सुरुवात केली अन् शिवाजीनगरात पोहचला. मंडईमधील गर्दीतून अवघ्या चार, पाच मिनिटांत शिवाजीनगर गाठणे एक स्वप्नावत होते. पुण्यातील हा मेट्रो मार्ग अंडरग्राऊंड असल्यामुळे काही ठिकाणी मोबाईलची रेंज जात असल्याचा अनुभव काही प्रवाशांनी सांगितला. त्यामुळे या ठिकाणी वायफाय करायला हवी, अशी सूचनाही केली.

शेअर रिक्षेच्या भाड्यात मेट्रो प्रवास

स्वारगेटहून मंडईत येणाऱ्या नागरिकांना आता शेअर रिक्षाच्या भाडेदरात मेट्रोने प्रवास करता येणार आहे. स्वारगेट ते मंडईसाठी केवळ 10 रुपये लागणार आहे. स्वारगेटहून पिंपरीला जाणाऱ्या प्रवाशांना अवघ्या 30 रुपयांत प्रवास करता येणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.

पुणे मेट्रोचे काम महामेट्रोने केले. महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग होते. आता त्यांची कामे पूर्ण झाली आहे. या मार्गावरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीत कुठलीही अडचण येणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

असे आहेत तिकीट दर

  • पीसीएमसी ते स्वारगेट – 30 रुपये
  • वनाज ते स्वारगेट – 25 रुपये
  • रामवाडी ते स्वारगेट – 35 रुपये
  • जिल्हा न्यायालय ते स्वारगेट 15
  • नळस्टॉप ते मंडई 20
  • शिवाजीनगर ते मंडई 15
  • स्वारगेट ते मंडई 10

हे ही वाचा…

जमिनीखालचे पुणे कसे आहे? अंडरग्राऊंड मेट्रोचे असे फोटो पाहिले का? तिकीट दर…

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!